Team WebNewsWala
मनोरंजन

शुभमंगल ऑनलाईन ने गाठला १०० भागांचा टप्पा

‘शुभमंगल ऑनलाईन’. सध्या ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक असून यात अभिनेत्री सायली संजीव आणि सुयश टिळक मुख्य भूमिकेत

छोट्या पडद्यावर प्रदर्शित होण्यापूर्वीच गाजलेली मालिका म्हणजे ‘शुभमंगल ऑनलाईन’. सध्या ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक असून यात अभिनेत्री सायली संजीव आणि सुयश टिळक मुख्य भूमिकेत झळकले आहेत. दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या या मालिकेने अलिकडेच १०० भागांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे मालिकेच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. ‘शुभमंगल ऑनलाईन’. सध्या ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक असून यात अभिनेत्री सायली संजीव आणि सुयश टिळक मुख्य भूमिकेत

सध्याच्या काळात प्रत्येक जण सोशल मीडियाच्या आहारी गेला आहे. त्यामुळे याच संकल्पनेवर आधारित ही मालिका आहे. शर्वरी आणि शंतनू या दोघांची एका व्हिडीओ कॉलवर ओळख होते आणि त्यांचं लग्नदेखील ऑनलाइनच होतं. परंतु, त्यांच्या संसारात आता ऐश्वर्याची एण्ट्री झाली आहे आणि संपूर्ण गणित फिसकटून गेलं आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या आल्यामुळे दिवसेंदिवस ही मालिका रंजक वळणावर पोहोचत आहे. यातच या मालिकेने १०० भागांचा टप्पा गाठला आहे.

१०० भाग पूर्ण केल्यामुळे सेटवर मोठं सेलिब्रेशन

मालिकेने १०० भाग पूर्ण केल्यामुळे सेटवर मोठं सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी मालिकेच्या टीमने मोठा केक कापत आनंद साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये सुकन्या कुलकर्णी मोने, सायली संजीव, सुयश टिळक, सुबोध भावे, मंजिरी भावे यांच्या आणि संपूर्ण टीम उपस्थित होती.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

बैरूत जखमींसाठी मिया खलिफा ने जमवला ७४ लाखांचा निधी

Team webnewswala

नैराश्यावर मात करा एक मिनिटाच्या फिल्ममध्ये उपाय

Team webnewswala

दोन वर्षांपासून २४० मराठी चित्रपट अनुदानासाठी रांगेत

Team webnewswala

Leave a Reply