धर्म राष्ट्रीय शिक्षण समाजकारण

6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन

राज्यातील पारंपरिक अभ्यासक्रम अर्थात BA B. Com साठी CET घ्यावी का याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली

6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन

Webnewswala Online Team – यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व विद्यापीठे व सलग्न महाविद्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून हा राज्यभिषेक दिवस ‘शिवस्वराज्य दिन‘ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित विविध प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करून हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.

6 जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. शिवराज्यभिषेक हा स्वराज्याची, स्वातंत्र्याची, सार्वभौमत्वाची प्रेरणा देणार दिवस म्हणून मानला जातो. यापुढे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये दर वर्षी 6 जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या संदर्भात गुरुवारी शासन आदेश काढून शिवस्वराज्य दिन कशा प्रकार साजरा करावा, याची माहिती दिली आहे. विद्यीपीठे, महाविद्यालयांमधील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी सकाळी ११ वाजता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस किंवा पुतळ्यास अभिवादन करावे. त्याचबरोबर शिवचरित्रपर व्याख्याने, पथनाट्ये, गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, निबंध, वत्कृत्व, गीत गायन, पोवाडा गायन, क्रीडा व इतर स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस साजरा करण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title – 6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन ( Shivswarajya Day will be celebrated in colleges and universities on June 6 )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

मुंबई विद्यापीठाची परीक्षा १ ते १७ ऑक्टोबरदरम्यान

Team webnewswala

बुधवारी खग्रास चंद्रग्रहण

Web News Wala

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प बांधकाम रोखण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

Web News Wala

Leave a Reply