Team WebNewsWala
राजकारण शहर

शिवसहकार सेना लढणार राजापूर अर्बन बँक निवडणूक

राजापूर तालुका शिवसेना व शिव सहकार सेना यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त सभा राजापूर मध्ये २२ ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. आगामी वर्षात होणारी राजापूर अर्बन बँक निवडणूक लढविण्याबाबत चर्चा,

राजापूर तालुका शिवसेना व शिव सहकार सेना यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त सभा राजापूर मध्ये २२ ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. आगामी वर्षात होणारी राजापूर अर्बन बँक निवडणूक लढविण्याबाबत चर्चा,

शिवसेना आमदार डॉ. राजनजी साळवी व शिव सहकार सेनेचे राजापूर तालुका संपर्क संघटक मा श्री समिरजी शिरवडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर तालुका शिवसेना व शिव सहकार सेना यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त सभा गुरुवार दि. २२.१०.२०२० रोजी दुपारी ३.०० वा किसान भवन, राजापूर येथे संपन्न झाली.

सदर बैठकीत आगामी वर्षात होणारी राजापूर अर्बन बँक निवडणूक लढविण्याबाबत चर्चा करण्यांत आली.

शिव सहकार सेना सदर निवडणूक स्वबळावर लढवेल

त्यानंतर आमदार डॉ राजनजी साळवी यांनी आपल्या छोटेखानी भाषणात जाहीर केले की शिवसेना-शिव सहकार सेना सदर निवडणूक स्वबळावर लढवेल व संबंधित पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे.

सदर सभेला शिवसेना आमदार सन्माननीय डॉ राजनजी साळवी, शिवसेना राजापूर तालुकाप्रमुख मा श्री प्रकाशजी कुवळेकर, पंचायत समिती सभापती मा श्री प्रकाशजी गुरव, महिला उप-जिल्हा संघटक मा सौ. दुर्वाताई तावडे, राजापूर शहर प्रमुख मा श्री. संजयजी पवार तसेच शिव सहकार सेनेचे रत्नागिरी (दक्षिण) उप-जिल्हा संघटक मा श्री सुशांतजी मराठे, राजापूर तालुका संपर्क संघटक मा श्री समिरजी शिरवडकर, तालुका संघटक मा श्री रविकांतजी भामत, महिला तालुका संघटक मा सौ प्रतिभाताई रेडीज व शिवसेना – युवासेना – शिवसहकार चे इतर सन्माननीय पदाधिकारीही उपस्थित होते.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल

Web News Wala

भिवंडी वीज कंपनीच्या विद्युत केबल आगीत जळून खाक

Web News Wala

भिवंडी लेखणी बोलते तेव्हा पुस्तक प्रकाशन आणि काव्य संमेलन संपन्न

Web News Wala

Leave a Reply