Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान

फेसबुक मॅसेंजरवर स्क्रीन शेअरिंग सुविधा

फेसबुक मॅसेंजरवर स्क्रीन शेअरिंग सुविधा मिळणार असून कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे. स्क्रीन शेअरिंग हे फिचर अलीकडच्या काळात लोकप्रिय झाले
फेसबुक मॅसेंजरवर स्क्रीन शेअरिंग सुविधा मिळणार असून याबाबत कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे.

स्क्रीन शेअरिंग हे फिचर अलीकडच्या काळात लोकप्रिय झाले आहे. व्हिडीओ कॉलींग अथवा ग्रुप व्हिडीओ कॉल करतांना याचा विपुल प्रमाणात वापर करण्यात येतो. झूमसारख्या अ‍ॅपवर याला मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

Screen sharing facility on Facebook Messenger

हे फिचर वेब आवृत्तीसह Android आणि IOS सिस्टीमसाठी

आता हीच सुविधा फेसबुक मॅसेंजरवरही वापरता येणार आहे. कंपनीने याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून माहिती जाहीर केली आहे. यानुसार व्हिडीओ कॉलींग अथवा ग्रुप कॉलींग करतांना याचा वापर करता येईल. हे फिचर वेब आवृत्तीसह अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटींग सिस्टीमसाठी प्रदान करण्यात आले आहे.

कुणीही आपला डिस्प्ले हे अन्य युजर्ससोबत शेअर करू शकतात

स्क्रीन शेअरिंगचा उपयोग करून कुणीही आपला स्मार्टफोन अथवा संगणकावरील डिस्प्ले हे अन्य युजर्ससोबत शेअर करू शकतात. यात स्मार्टफोनच्या कॅमेर्‍यातील छायाचित्रे वा व्हिडीओज अन्य युजर्ससोबत शेअर करता येतील.

Screen sharing facility on Facebook Messenger

तसेच याच्या मदतीने एकत्र वेब ब्राऊजींग, शॉपींग पोर्टल्सवरील खरेदी आदी बाबीही यामुळे शक्य होतील. हे फिचर ग्रुप कॉलींग आणि मॅसेंजर रूम्स या दोन्हींमध्ये वापरता येईल. सध्या ग्रुप कॉलींगसाठी ८ तर रूम्ससाठी १६ युजर्सची मर्यादा असल्याने हे सर्व युजर्स स्क्रीन शेअरिंगचा वापर करू शकतात.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Twitter Blue Undo, Color Themes सह मिळणार अनेक वैशिष्ट्ये

Web News Wala

Go SMS Pro हे अ‍ॅप गुगलने प्ले स्टोअरवरुन हटवलंय.

Team webnewswala

भारतात पहिल्यांदाच हींग शेतीचा प्रयोग

Team webnewswala

2 comments

व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपमध्ये पाहता येणार शेअरचॅटचे व्हिडीओ - Web News Wala August 8, 2020 at 8:23 pm

[…] फेसबुक मॅसेंजरवर स्क्रीन शेअरिंगची स… […]

Reply
आत्मनिर्भर अ‍ॅप चॅलेंज, चिंगारी ठरले सर्वोत्कृष्ट - Team WebNewsWala September 20, 2020 at 8:47 pm

[…] फेसबुक मॅसेंजरवर स्क्रीन शेअरिंगची स… […]

Reply

Leave a Reply