Team WebNewsWala
आरोग्य शहर

मुंबईतील शाळा, महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंदच

करोनाच्या नव्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय मुंबईतील शाळा, महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंदच राहतील

मुंबई : करोनाच्या नव्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून मुंबईतील शाळा, महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंदच राहतील असा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी खबरदारी म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा व महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेडून घेण्यात आला आहे.

करोनाचा प्रसार आणि प्रचार कमी होत असतानाच ब्रिटनमधून आलेल्या नव्या विषाणूने साऱ्यांना धडकी भरवली आहे. भारतात या विषाणूची लागण झाल्याचे काही रूग्ण आढळले आहेत.

१०वी, १२वीच्या परिक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे 

करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबत महत्त्वाची बाब म्हणजे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२वीच्या पूर्वनियोजित पुरवणी परिक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येतील अशा सूचना महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

एकच मुलगी असणाऱ्या कुटुंबात महाराष्ट्रात मुंबई टॉप

Team webnewswala

भाडेवाढीचा मिटर डाऊन, मुंबईत रिक्षा टॅक्सी ची भाडेवाढ

Web News Wala

नाशिकचा आर्यन शुक्ल ज्युनिअर मेंटल मॅथ्स स्पर्धेत विश्वविजेता

Team webnewswala

Leave a Reply