Team WebNewsWala
Other अर्थकारण नोकरी राष्ट्रीय

कोट्यावधी खातेधारकांना SBI चे गिफ्ट अनेक सेवांवरील शुल्क रद्द

एटीएममधून अथवा बँकेच्या शाखेतून रोख रक्कम काढणे, चेकबुक या संदर्भातले State Bank of India चे नियम 1 जुलै 2021 पासून बदलणार

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने ( SBI ) खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. कोट्यावधी खातेधारकांना SBI चे गिफ्ट अनेक सेवांवरील शुल्क रद्द करत यापुढे कोणतेही शुल्क न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात एसएमएस अलर्ट आणि मिनिमम बँलेंसच्या शुल्काचा समावेश आहे. एसबीआयच्या 44 कोटी खातेधारकांना याचा फायदा होईल.

SBI चे गिफ्ट अनेक सेवांवरील शुल्क रद्द

SBI ने निर्णय घेतला आहे की ग्राहकांकडून एसएमएस अलर्ट आणि मिनिमम बँलेंसचे शुल्क आकारले जाणार नाही. या सेवा मोफत दिल्या जातील. सोबतच इतर अ‍ॅप्सच्या ऐवजी #YONOSBI डाऊनलोड करावे. बँकेने ग्राहकांना खात्याच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर बँकिंग सर्व्हिसेज मेसेजसाठी लागणारेसेवांवरील शुल्क आता रद्द केले आहे. आता अतिरिक्त मिनिमम बँलेंस ठेवणे देखील गरजेचे नाही.

याआधी एसबीआयच्या ग्राहकांना खात्यात कमीत कमी 3000 रुपये रक्कम ठेवावी लागत असे. रक्कम 50 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास 10 रुपये व त्यावरील जीएसटी असे शुल्क भरावे लागत असे.

दरम्यान, एसबीआयने काही दिवसांपुर्वीच एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहेत. आता ग्राहक केवळ 8 वेळा मोफत पैसे काढू शकतील. तसेच एटीएममधून पैसे काढताना, खात्यात पैसे नसल्यामुळे व्यवहार रद्द झाल्यास ग्राहकांना 20 रुपये व जीएसटी असे शुल्क भरावे लागेल.

नक्की वाचा >>
बैरूत जखमींसाठी मिया खलिफा ने जमवला ७४ लाखांचा निधी
भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल
नैराश्यावर करा मात एक मिनिटाच्या फिल्ममध्ये उपाय

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

United Spirits च्या CEO पदी हिना नागराजन

Team webnewswala

इराणी चलन गाळात; एका डाॅलरसाठी पाउणे तीन लाख रियाल

Team webnewswala

फेसबुक बंद करणार आपले हे लोकप्रिय अ‍ॅप

Team webnewswala

Leave a Reply