Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय व्यापार

सौदी अरेबिया बनवतेय car free city ‘The Line’

तेलापलीकडे सौदी अरेबियाचं भवितव्य काय असेल ? त्या दृष्टीने सौदी अरेबिया ‘The Line’ नावाचे car free city उभारत आहे.

सौदी अरेबिया : सौदी अरेबिया आज तेल संपन्न देश आहे. पण भविष्यात कधी ना कधी तेल संपणार, त्यानंतर पुढे काय ? असा प्रश्न निर्माण होतो. त्या दृष्टीने सौदी अरेबियाने आतापासून तयारी सुरु केली आहे. सौदी अरेबिया ‘The Line’ नावाचे  car free city उभारत आहे. तेलापलीकडे सौदी अरेबियाचं भवितव्य काय असेल? त्या दृष्टीने क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी आपलं व्हिजन मांडलं आहे.

सौदी अरेबिया कार, रस्ते विरहित तसेच जिथे कार्बन उत्सर्जन होणार नाही, असं शहर उभारणार आहे. सौदी अरेबिया ‘The Line’ नावाचे शहर उभारत आहे. हे शहर ५०० अब्ज डॉलर्सच्या ‘नियोम’ प्रकल्पाचा एक भाग आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत या शहराच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याची घोषणा क्राऊन प्रिन्सने रविवारी केली. कार, रस्त्याशिवाय नैसर्गिक दृष्टीने या शहराची उभारणी करण्यात येणार आहे. ब्लूमबर्गने हे वृत्त दिले आहे.

‘The Line’ City 

या शहरात १० लाख लोकांच्या वास्तव्याची व्यवस्था असेल. २०३० पर्यंत या शहरात ३ लाख ८० हजार रोजगार निर्मिती होईल. या शहराच्या पायाभूत सोयी-सुविधांच्या उभारणीचा खर्च १०० अब्ज ते २०० अब्ज डॉलर्स असेल. ‘नियोम’ हा सौदी क्राऊन प्रिन्सच्या योजनेतील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे.

‘नियोम’ टेक्नोलॉजिकल आणि काही अन्य उद्योगांचे केंद्र असेल. या प्रकल्पावरुन वादही झाला आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आला, तर त्यात अपेक्षित गुंतवणूक होईल का? असा विश्लेषकांचा सवाल आहे. पुढच्या १० वर्षात नियोममध्ये सौदी सरकार, पीआयएफ आणि स्थानिक, जागतिक गुंतवणूदार ५०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करतील असे क्राऊन प्रिन्सने पत्रकारांना सांगितले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

General Atlantic ची Reliance मध्ये गुंतवणूक

Team webnewswala

हार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती

Team webnewswala

चिनी अलिबाबा साठी अमेरिकेची गुहा बंद होणार

Team webnewswala

Leave a Reply