Other सिनेमा

सारा आणि वरुणचा ‘कुली नंबर १’ रिलीज डेट जाहिर

varun-dhavan-sara-ali-khan-kooli-no-1
सारा आणि वरुणचा ‘कुली नंबर १’ रिलीज डेट जाहिर करण्यात आली

गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाने नव्वदच्या दशकात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी या चित्रपटाची लोकप्रियता पाहाता त्याचा रिमेक करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान या रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची रिलीज डेट आता जाहिर करण्यात आली आहे.

वरुण धवनने ट्विट करत नुकतीच चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे. येत्या ख्रिसमसला अॅमेझॉन प्राईमवर ‘कुली नं. १ हा चित्रपट रिलीज होणार असल्याचे त्याने म्हटले आहे. सारा आणि वरुणचा ‘कुली नंबर १ हा चित्रपट यापूर्वी १ मे २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. हा चित्रपट आता २५ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

https://twitter.com/Varun_dvn/status/1314436679218860033

१९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाचा रिमेक

१९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी या चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. नव्या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री सारा अली खान देखील झळकणार आहे. सारा आणि वरुणला एकत्र चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

चीनला दणका, गुगलने हटवले 2500 युट्यूब चॅनेल्स

Team webnewswala

Bajaj Auto ने बंद केली Bajaj Chetak इलेक्ट्रिक ची बूकिंग

Team webnewswala

Disney Layoff थीमपार्कमधील कमर्चाऱ्यांना लॉकडाउन चे चटके

Team webnewswala

1 comment

OTT चा चित्रपटगृह मालकांना आणखी एक मोठा धक्का - Team WebNewsWala October 11, 2020 at 9:14 pm

[…] माहौल लक्षात घेता ‘सूर्यवंशी’, ‘८३’, ‘कुली नं. १’ सारख्या मोठ्या हिंदी चित्रपटांच्या […]

Reply

Leave a Reply