Other सिनेमा

वाढदिवसानिमित्त संजय दत्त ची चाहत्यांना अनोखी भेट

KGF Chapter 2
KGF chapter 2 मधील खतरनाक अधिराचा चा लुक आणला प्रेक्षकांसमोर

केजीएफच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरभरुन दिले होते, त्याचबरोबर चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता यशने साकारलेल्या भूमिकेचे देखील कौतुक झाले. आता प्रेक्षक KGF: Chapter 2 मधील रॉकीभाईची आतुरतेने वाट पाहत आहेत.

केजीएफच्या दुसऱ्या भागात यशसह अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रविना टंडनदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात संजय दत्त ‘अधीरा’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. नुकताच KGF: Chapter 2 मधील ‘अधीरा’चा लूक रिलीज करण्यात आला असून या अवतारात संजय दत्त खूपच भयावह अवतारात दिसत आहे.

संजय दत्तचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला

दरम्यान यापूर्वी ‘अग्निपथ’ या चित्रपटात संजय दत्तने ‘कांचा चिना’ ही खलनायकाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्याच्या चित्रपटातील लूकला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय दत्त ‘अधीरा’च्या भूमिकेत आपल्या भेटीला येणार आहे.

आपल्या लूकचा फोटो शेअर करताना संजय दत्तने कॅप्शनमध्ये लिहिले की, “या चित्रपटात काम करणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, वाढदिवसाच्या दिवशी मी यापेक्षा अधिक चांगली भेट काय शकतो? चाहत्यांचे प्रेम आणि समर्थन “खूप धन्यवाद.” अभिनेता संजय दत्त आज आपला वाढदिवस साजरा करीत आहे.

हे ही वाचा
चीनी वस्तुंना विरोध केवळ दिखावा दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग
पाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी
नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक
अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक ?
आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पुण्यात अष्टविनायक गणपती मंडळातर्फे सेवा उत्सव

Team webnewswala

लवकरच मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 मार्गावर चाचणी

Web News Wala

ख्रिस्तोफर नोलन चा सर्वात मोठा चित्रपट तिसऱ्यांदा लांबणीवर

Team webnewswala

1 comment

SADAK 2 ट्रेलर रिलीज होताच काही तासांतच लाखो डिसलाइक्स - Web News Wala August 17, 2020 at 5:31 pm

[…] आलिया भट्टच्या (aalia bhatt) आणि अभिनेता संजय दत्त (sanjay dutt) यांच्या सडक 2 चित्रपटाचा ट्रेलर […]

Reply

Leave a Reply