Team WebNewsWala
सिनेमा

सलमानच्या राधे चा जलवा Zee 5 चा सर्व्हर झाला क्रॅश

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राधे - युवर मोस्ट वॉंटेड भाई’ हा चित्रपट आज ईदला प्रदर्शित करण्यात आला आहे.

सलमानच्या राधे चा जलवा Zee 5 चा सर्व्हर झाला क्रॅश 

मुंबई – webnewswala Online Team 

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राधे – युवर मोस्ट वॉंटेड भाई’ हा चित्रपट आज ईदला प्रदर्शित करण्यात आला आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपट Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. पण एकाच वेळी लाखो चाहते चित्रपट पाहात असल्यामुळे या ओटीटी प्लॅटफॉर्मचा सर्व्हर क्रॅश झाला आहे.

सलमान खानचा चित्रपट म्हटलं की चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. त्यामुळे सर्वजण ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात होते. गुरुवारी सलमानचा हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शित होताच लाखो चाहते एकाच वेळी चित्रपट पाहू लागले. त्यामुळे सर्व्हर क्रॅश झाला.

सलमानच्या राधे चा जलवा Zee 5 चा सर्व्हर झाला क्रॅश

सर्वर क्रॅश झाल्यामुळे ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ चित्रपट पाहाता येत नसल्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली होती. जवळपास एक तासानंतर अॅप पुन्हा सुरु झाले.

‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटाणी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, गोविंदा, गौतम गुलाटी, प्रविण तरडे हे कालाकार दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु देवाने केले आहे. या चित्रपटाची घोषणी २०१९ मध्ये करण्यात आली होती. २०२०मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

Title – सलमानच्या राधे चा जलवा Zee 5 चा सर्व्हर झाला क्रॅश ( Salman’s Radhe’s Jalwa Zee 5’s server crashes )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

चक्क आयफोनवर संपूर्ण ‘पिच्चर’ चे चित्रीकरण

Web News Wala

जॉन अब्राहम इमरान हाशमी यांच्या ‘Mumbai Saga’ चा Teaser Realese

Web News Wala

ख्रिस्तोफर नोलन चा सर्वात मोठा चित्रपट तिसऱ्यांदा लांबणीवर

Team webnewswala

1 comment

राधे नंतर आता ‘मैदान’ OTT Platform वर रिलीज - Team WebNewsWala May 23, 2021 at 8:01 pm

[…] ‘दबंग’ अभिनेता सलमान खानने त्याची ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ ही फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज […]

Reply

Leave a Reply