Team WebNewsWala
सिनेमा

सलमानच्या राधे ला जॉन च्या सत्यमेव जयते 2 ची टक्कर

ईदला 13 मे या दिवशी जॉनचा 'सत्यमेव जयते 2' हा सिनेमा चित्रपटगृहात धडकरणार आहे. सलमान खानचा 'राधे' हा सिनेमादेखील ईदलाच रिलीज होणार आहे
सलमानच्या राधे ला जॉन च्या सत्यमेव जयते 2 ची टक्कर
येत्या 19 मार्चला जॉन अब्राहमचा ‘मुंबई सागा‘ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. त्यातच जॉनच्या आगामी ‘सत्यमेव जयते 2‘ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

येत्या ईदला म्हणजेच 13 मे या दिवशी जॉनचा ‘सत्यमेव जयते 2‘ हा सिनेमा चित्रपटगृहात धडकरणार आहे. सलमान खानचा ‘राधे‘ हा सिनेमादेखील ईदलाच रिलीज होणार आहे. त्यामुळे ‘सत्यमेव जयते 2‘ आणि ‘राधे‘ यांची बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळेल. दोनही सिनेमा हे दमदार अ‍ॅक्शन पॅक असल्याने प्रेक्षक कोणत्या सिनेमाला अधिक पसंती देणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

जॉन अब्राहमने इन्स्टाग्रामवर केल पोस्टर शेअर

या पोस्टरमध्ये जॉनचा डबलरोल पाहायला मिळतोय. “या ईदला सत्या आणि जय मध्ये होणार टक्कर.. भारत मातेसाठी यावर्षी तिचे दोन्ही पुत्र लढतील.” अशा आशयाचं कॅप्शन जॉनने या पोस्टरला दिलंय. या सिनेमात ज़ॉन एका भूमिकेत पोलीस ऑफिसरच्या रुपात झळकणार असल्याचं पोस्टरमध्ये दिसतंय.

गेल्या काही वर्षांमध्ये फक्त सलमान खानचे सिनेमा ईदला प्रदर्शित होत असल्याचं लक्षात येतं. मात्र यंदा सलमानला टक्कर देण्यासाठी जॉनचा दमदार अ‍ॅक्शन सिनेमादेखील प्रदर्शित होतोय.

सलमानला टक्कर देण्यासाठी जॉनचा सिनेमादेखील होतोय प्रदर्शित 

सलमान खानने देखील काही दिवसांपूर्वीच ‘राधे – युवर मोस्ट वॉन्टेड भाई‘ सिनेमाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.सलमान खानने हे पोस्टर शेअर करत चाहत्यांसाठी एक कॅप्शन दिलं होतं. ” ईदची कमिटमेन्ट दिली होती. ईदलाच येणार क्यू की एक बार जो मैने.” असं खास कॅप्शन त्यानं दिलं होतं.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

आता सलमान राबविणार मुळशी पॅटर्न

Team webnewswala

गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल धमाकेदार ट्रेलर रिलीज

Team webnewswala

सारा आणि वरुणचा ‘कुली नंबर १’ रिलीज डेट जाहिर

Team webnewswala

Leave a Reply