Team WebNewsWala
सिनेमा

सलमान खान नं नाकारली २५० कोटींची ऑफर

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राधे - युवर मोस्ट वॉंटेड भाई’ हा चित्रपट आज ईदला प्रदर्शित करण्यात आला आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ असं आहे. या चित्रपटाला ऑनलाईन प्रदर्शित करण्यासाठी तब्बल २५० कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. परंतु सलमाननं ओटीटीला साफ नकार दिला आहे. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत थिएटरमध्येच प्रदर्शित होईल, अशी भूमिका त्याने घेतली आहे.

राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभू देवाने स्विकारली आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत त्याने या चित्रपटावर भाष्य केलं. तो म्हणाला, “करोनामुळे अनेक चित्रपटांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शिवाय थिएटर देखील बंद आहेत. त्यामुळे काही निर्मात्यांनी आपले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले.

नुकसान झालं तरी चालेल पण सलमान थिएटरमध्येच येणार

मात्र सलमान हा मोठ्या पडद्यावरील सुपरस्टार आहे. चाहत्यांना त्याला मोठ्या पडद्यावरच पाहायला आवडतं. राधेला ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी २५० कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. परंतु आम्ही त्यास नकार दिला. कितीही नुकसान झालं तरी चालेल पण सलमान चाहत्यांसाठी मोठ्या पडद्यावरच येणार अशी भूमिका आमच्या टीमनं घेतली आहे.”

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

करण जोहरच्या ‘Mumbaikar’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

Web News Wala

100 मिनिटांत कथा सांगणारे 10 उत्कृष्ट बॉलीवूडपट

Web News Wala

दिवाळीच्या मुहूर्तावर येणार अक्षय कुमार चा लक्ष्मी बॉम्ब

Team webnewswala

Leave a Reply