Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय व्यापार

Microsoft ने Sony विकत घेतल्याची अफवा Viral

अमेरिकेची दिग्गज टेक कंपनी माइक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने मल्टिनॅशनल कंपनी सोनी च्या सर्व विभागांना १३० अब्ज डॉलरमध्ये खरेदी केल्याचं वृत्त

Microsoft ने Sony कंपनी विकत घेतल्याची अफवा Viral

अमेरिकेची दिग्गज टेक कंपनी माइक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने (Microsoft Corporation) आपली विरोधी मल्टिनॅशनल कंपनी सोनी कॉर्पोरेशनच्या (Sony Corporations) सर्व विभागांना तब्बल १३० अब्ज डॉलरमध्ये खरेदी केल्याचं वृत्त स्पेनच्या एका न्यूज पोर्टलने दिल्याने नेटकरी आणि विशेषतः गेमर्समध्ये खळबळ उडाली.

व्हिडिओ गेमिंगच्या जगतात Xbox आणि PlayStation दोघांचंही वर्चस्व

माइक्रोसॉफ्टकडे स्वतःचा Xbox नावाचा गेमिंग प्लॅटफॉर्म आहे. या कॅटेगरीमध्ये माइक्रोसॉफ्टच्या Xbox ला सोनीच्या PlayStation कडून जबरदस्त टक्कर मिळते. त्यामुळे व्हिडिओ गेमिंगच्या जगतात दोघांचं वैर सर्वश्रूत आहे. याच कारणामुळे माइक्रोसॉफ्टने सोनीला खरेदी केल्याचं वृत्त आल्यानंतर गेमर्स चांगलेच हैराण झाले होते.

Microsoft ने Sony विकत घेतल्याची अफवा Viral सत्य काय ?

पण या वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. सर्वप्रथम स्पेनच्या एका वेबसाइटने हे वृत्त दिलं. त्यानंतर माइक्रोसॉफ्टर्स नावाच्या एका वेबसाइटने हेच वृत्त शेअर केलं. इंग्रजीमध्ये भाषांतर झाल्यामुळे ही बातमी सोशल मीडिया चांगलीच व्हायरल झाली आणि गेमर्समध्ये एकच खळबळ उडाली. स्पेनच्या वेबसाईटने आपल्या वृत्तात बरेच डिटेल्स दिले होते. म्हणजे हा करार १३० अब्ज डॉलरमध्ये झाला असून सोनीसोबत विस्तार करण्यासाठी माइक्रोसॉफ्टने एक व्यापक योजना बनवली आहे, अशाप्रकारची माहिती त्यांनी दिली होती.

Day of the Holy Innocents

इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतरही सोनी किंवा माइक्रोसॉफ्ट यांच्याकडून या कराराबाबत कोणतंही भाष्य करण्यात आलं नाही. इतका मोठा करार जो वर्षातला सर्वात मोठा करार ठरला असता आणि जगभरातील माध्यमांसाठी सर्वात मोठी बातमी ठरली असती पण स्पेनची एक वेबसाइट आणि एक-दोन ब्लॉग्सशिवाय कोणीच ही बातमी दिली नाही. एक-दोन माध्यमांनी सुरूवातीला ही बातमी दिली पण लगेचच त्यांनीही बातमी डिलीट केली. खरं म्हणजे स्पेनच्या वेबसाइटने २८ डिसेंबर रोजी हे वृत्त दिलं होतं. हा दिवस स्पेनमध्ये ‘Day of the Holy Innocents’ म्हणून साजरा केला जातो. हा एकप्रकारचा ‘एप्रिल फूल’ दिवस असतो. त्यामुळे या वृत्तात कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

नववर्षाच्या आतषबाजीने रस्त्यावर मरुन पडले शेकडो पक्षी

Web News Wala

मॉरिशस संकट वाढलं; तेलगळती होणारं जहाज तुटण्याची शक्यता

Team webnewswala

पाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी

Team webnewswala

Leave a Reply