Team WebNewsWala
Other पर्यावरण शहर

गणेशोत्सवासंदर्भात मुंबई पुण्यासाठी नियमावली जाहीर

यंदा कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासंदर्भात मुंबई, पुण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. दरवर्षी अगदी उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला मात्र यंदा कोरोनाने अडथळे आणले आहेत.

यंदा कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासंदर्भात मुंबई, पुण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. दरवर्षी अगदी उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला मात्र यंदा कोरोनाने अडथळे आणले आहेत.

गणेशोत्सवासंदर्भात मुंबई पुण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी या नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे.

गणेशोत्सवासंदर्भात मुंबईसाठी नियमावली –

 • यंदा नागरिकांना समुद्र किंवा तलावावर थेट गणपतीचे विसर्जन करता येणार नाही.
 • नैसर्गिक किंवा कृत्रीम विसर्जन स्थळे आहेत तेथे १ ते २ किमीच्या परिघातील नागरिकांनीच गणेश विसर्जनासाठी जाता येणार आहे.
 • नागरिकांना जवळील विसर्जन स्थळ नसल्यास महापालिकेच्या मूर्तीसंकलन केंद्रात गणेशमूर्ती द्यावी.
 • विसर्जनापूर्वीची पूजा, आरती आणि इतर विधी घरीच पूर्ण करण्याचं आवाहन महापालिकेने केलं आहे.
 • मुंबईत नैसर्गिक विसर्जन 70 आणि कृत्रिम विसर्जन स्थळे 167 असतील.

गणेशोत्सवासंदर्भात पुण्यासाठी नियमावली –

  • गणेशोत्वस मंडळांनी गणपतीची मुर्ती ऑनलाईन खरेदी करावी. रस्त्याच्या कडेल स्टॉलला परवानगी नसेल.
  • गणपतीच्या आगमन आणि विसर्जनावेळी मिरवणुका काढता येणार नाहीत.
  • ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मंदिरे आहेत, त्यांनी प्रतिष्ठापना मंदिरात करावी. मंदिर नसल्यास छोटा मंडप उभारण्याची परवानगी आहे.
  • सार्वजनिक मंडळांची गणेश मूर्ती चार फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची दोन फूट मर्यादित असावी.
नक्की वाचा >> 
यंदा सार्वजनिक गणेश मंडळे निरूत्साही 
पर्यावरण पुरक गणेशोत्सवासाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउन सज्ज

आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मातृसेवा फाऊंडेशन मार्फत ठाण्यात वृक्षबंधन सोहळा

Team webnewswala

देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी ग्रेस फाउंडेशन कडुन टॅब

Team webnewswala

राम मंदिराप्रमाणे अयोध्या रेल्वे स्टेशन चाही कायापालट

Team webnewswala

Leave a Reply