अर्थकारण

१ डिसेंबर पासून RTGS सुविधा २४ तास

मोदी सरकार विकणार आणखी एक सरकारी बँक बँक ऑफ इंडिया विकायचा विचार करीत आहे. म्हणजेच बँक ऑफ इंडिया देखील खाजगी हातात जाऊ शकते.

पुढील महिन्यापासून म्हणजेच १ डिसेंबर पासून बँकिंगशी निगडीत एका नियमामध्ये बदल होणार आहे. दरम्यान, या बदलणाऱ्या नियमाचा ग्राहकाना मोठा फायदाही होणार आहे. पुढील महिन्यापासून रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंटची (RTGS) सुविधा २४ तास मिळणार आहे. ग्राहकांना आरटीजीएसद्वारे ३६५ दिवस कधीही पैसे पाठवता येणार आहेत.

RTGS सुविधा २४ तास

ऑक्टोबर महिन्यात RTGS सुविधा २४ तास करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला होता. ही सुविधा २४ तास सुरू झाल्यानंतर ज्यांच्याकडे २४*७*३६५ लार्ज व्हॅल्यू रिअल टाईम पेमेंट सिस्टम असलेल्या जगातील अवघ्या काही देशांच्या भारत सामील होणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं. सध्या RTGS ची सुविधा दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवार सोडून कामकाजाच्या इतर दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात उपलब्ध आहे.

RTGS द्वारे त्वरित पैसे पाठवण्यास मदत होते. मोठी रक्कम पाठवण्यासाठी या सुविधेचा प्रामुख्यानं वापर केला जातो. निरनिराळ्या बँकांसाठी पैसे पाठवण्याची मर्यादा ही निरनिराळी आहे. यापूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरशी (NEFT) निगडीत नियमांत बदल करण्यात आला होता. गेल्या वर्षापासून ग्राहकांसाठी २४*७*३६५ ही सुविधा उपलब्ध आहे.

NEFT द्वारे पाठवण्यात येणाऱ्या पैशांना किमान मर्यादा नाही. तसंच कमाल मर्यादा ही निरनिराळ्या बँकांवर अवलंबून आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

100 ची नवीन नोट वार्निश currency, ना फाटनार ना भिजणार

Web News Wala

१ नोव्हेंबर पासून सिलिंडर बूकिंग, बँक चार्ज होणार बदल

Team webnewswala

मोदी काळात अदानी, अंबानी सह 4.12 लाख कुटुंबांना अच्छे दिन

Web News Wala

Leave a Reply