Team WebNewsWala
अर्थकारण राष्ट्रीय

रोशनी नाडर ठरल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला

Kotak Wealth and Hurun India ने 2020 मधील देशातील 100 सर्वात श्रीमंत महिलांची यादी जाहीर केली असून, एचसीएल टेक्नोलॉजीच्या अध्यक्षा रोशनी नाडर मल्होत्रा भारताच्या सर्वात श्रीमंत महिला आहेत.

Kotak Wealth and Hurun India ने 2020 मधील देशातील 100 सर्वात श्रीमंत महिलांची यादी जाहीर केली असून, या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीच्या अध्यक्षा रोशनी नाडर मल्होत्रा भारताच्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. जुलै महिन्यात रोशनी नाडर (Roshni Nadar) यांना एचसीएल टेक्नोलॉजीचे (HCL) चेअरपर्सन म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांची एकूण संपत्ती 54850 कोटी रुपये आहे. (HCL’s Roshni Nadar tops list of India’s richest women)

या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर Biocon च्या संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर किरण मजूमदार शॉ आहेत. त्यांची संपत्ती 36600 कोटी रुपये आहे.

मुंबई स्थित फार्मा कंपनी USV प्राइव्हेट लिमिटेडच्या लीना गांधी तिवारी 21 हजार 340 कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानी आहेत.

कोण आहेत रोशनी नाडर ?

1976 साली शिव नाडर यांनी एचसीएल टेक्नोलॉजीची स्थापना केली होती. रोशनी या त्यांच्या मुलगी आहेत. या वर्षी जुलै महिन्यात कंपनीने रोशनी नाडर यांच्या कंपनीच्या अध्यक्षा म्हणून घोषणा केली होती. ही तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोत मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. एचसीएल एंटरप्रायझेसची किंमत 9.9 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी असून, येथे जवळपास दीड लाख लोक काम करतात.

प्रसार माध्यमांमध्ये विशेष रुची असलेल्या शिव यांच्या कन्या रोशनी या एचसीएल टेक्नॉलॉजिजच्या संचालक मंडळात सर्वप्रथम 2013 मध्ये रुजू झाल्या. येथे त्यांनी उपाध्यक्षपदाची भूमिकाही बजाविली होती. एचएसीएलमध्ये येण्याआधी त्या वृत्तनिर्मात्या म्हणून देखील काम करत असे. वयाच्या 27व्या वर्षीच त्या एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्याधिकारी झाल्या होत्या.

सुरुवातीचे शिक्षण दिल्लीत

त्यांचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीत झाले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पदवी मिळवली. याच विद्यापीठाच्या केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून रोशनी यांनी एमबीए पूर्ण केले.

2010 मध्ये रोशनी शिखर मल्होत्रा यांच्याशी लग्न केले. शिखर मल्होत्रा हे एचसीएलच्या हेल्थ केअरचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. दोघांना दोन मुले आहेत. वाईल्ड लाईफ आणि कन्झर्वेशनमध्ये रस असलेल्या रोशनी नाडर मल्होत्रा यांनी 2018 मध्ये ‘द हॅविट्स ट्रस्ट’ची स्थापना केली होती. (HCL’s Roshni Nadar tops list of India’s richest women)

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

राज्यपालांनी लॉकडाउनमध्ये लिहिली १३ पुस्तके

Team webnewswala

Reliance Jio Q2 कंपनीच्या नफ्यात तिप्पट वाढ

Team webnewswala

पंतप्रधान मोदी करणार १० डिेसेंबरला संसदेच्या नव्या इमारतीचे भूमीपूजन

Team webnewswala

Leave a Reply