Team WebNewsWala
पर्यावरण पोटोबा व्यापार

रितेश विकतोय ‘शाकाहारी मटण’… काय आहे हे प्रकरण 

go vegan

जगभरात लोकांचे शाकाहारी होण्याचे प्रमाण वाढत आहे. मांसाहार करणाऱ्यांचे मांसाहारावर किती प्रेम असते हे सगळ्यांनाच माहित आहे. अशावेळी मांसाहार सोडणे त्यांच्यासाठी कठीण होऊन बसते. ही समस्या सगळ्यांनाच असते, मग तो अगदी बॉलिवूडचा स्टार रितेश देशमुख का असो

यावर उपाय म्हणून रितेशने एक भन्नाट गोष्ट शोधून काढली होती. आता हीच गोष्ट बिझनेसच्या माध्यमातून तो भारतीयांसाठी घेऊन येत आहे.

रितेश म्हणतो की चार वर्षांपूर्वी जेव्हा मी आणि जेनेलियाने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी जेनेलियाला ही गोष्ट कठीण गेली नाही, पण मी कबाब, खिमा सारख्या गोष्टी खूप मिस करत होतो. मग त्याने काही इंटरनॅशनल उत्पादने खाऊन पाह्यली. या पदार्थांचा स्वाद तर मांसासारखा असतो, पण खरंतर त्यात मांस नसते. आता हाच नविन व्यवसाय रितेश आणि जेनेलिया सुरू करत आहेत.

View this post on Instagram

Just @imaginemeats #plantbased

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

रितेश आणि जेनेलिया सुरू करत आहेत नविन व्यवसाय

प्लांट बेस्ड वेगन प्रॉडक्ट असं या प्रकाराचं नाव आहे. यात सगळ्या गोष्टी या पूर्णपणे झाडांपासून मिळणाऱ्या विविध गोष्टींपासून बनवलेल्या असतात. उदा. कोकोनट ऑइल, हरभऱ्याचे प्रोटीन इत्यादी. यांची चव अस्सलपणाच्या इतकी जवळ जाते की अगदी खवय्या मांसाहारी व्यक्तीलाही आपण खरंतर शाकाहारी खाद्य खात आहोत हे कळत नाही.

जेनेलिया आणि रितेशभाऊंनी ADM नावाची अमेरिकन कंपनी आणि गुड फूड यांच्यासोबत करार केला आहे. या कंपनीसोबत मिळून लवकरच हे दोघे झाडांपासून बनलेले कबाब, बिर्याणीसारखे पदार्थ तयार करणार आहेत.

झाडांपासून तयार होणारे ही उत्पादने जगभर प्रसिद्ध होत आहेत. पशुप्रेमींसाठी ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. रितेशने या कंपनीचे नाव इमॅजिन मीट्स (Imagine Meats) असं ठेवलं आहे. हे प्रॉडक्टस आरोग्यासाठीसुद्धा खूप चांगले आहेत. आपल्या या लाडक्या मराठमोळ्या जोडीने हे प्रॉडक्ट्स देशभरात प्रसिद्ध करण्याचा चंग बांधलाय.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | इंस्टाग्राम | youtube | ट्विटर | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Myntra पाठोपाठ Amazon ने केला लोगोत बदल

Web News Wala

कारखान्याला ऊस न विकता हा कमावतोय लाखो रुपये

Web News Wala

मुंबईत इथून पुढे देशी झाडांचीलागवड

Web News Wala

2 comments

मराठीतला पहिला 'झॉम-कॉम' सिनेमा ‘झोंबिवली’ - Web News Wala July 31, 2020 at 5:49 pm

[…] रितेश विकतोय ‘शाकाहारी मटण’ …. काय आहे… […]

Reply
कात्रजच्या प्राणी संग्रहालयातील नंदिनी वाघिणीचा मृत्यू - Team WebNewsWala October 13, 2020 at 4:02 pm

[…] रितेश विकतोय ‘शाकाहारी मटण’ …. काय आहे… […]

Reply

Leave a Reply