आंतरराष्ट्रीय आरोग्य

वाळूच्या टंचाईमुळे कोरोना लसीच्या वितरणाला ब्रेक लागण्याचा धोका

दोन वर्षात जगाच्या कानाकोपऱ्यात करोना लस पोहोचवण्याचे उद्दिष्ट्य असले तरी वाळूच्या टंचाईमुळे कोरोना लसीच्या वितरणाला ब्रेक लागण्याचा धोका

वाळूच्या टंचाईमुळे कोरोना लसीच्या वितरणाला ब्रेक लागण्याचा धोका

वॉशिंग्टन – आगामी दोन वर्षाच्या कालावधीत जगाच्या कानाकोपऱ्यात करोना लास पोहोचवण्याचे उद्दिष्ट्य असले तरी वाळूच्या टंचाईमुळे कोरोना लसीच्या वितरणाला ब्रेक लागण्याचा धोका आहे.

एका विशिष्ट प्रकारच्या वाळूची गरज

करोना सारख्या लसी ज्या काचेच्या बाटल्यांमधून वितरित केल्या जातात त्या बाटल्या निर्माण करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या वाळूची गरज असते पण अशा वाळूची आता टंचाई जाणवू लागल्याने त्याचा फटका लसीच्या उत्पादनावर होणार आहे आगामी २ वर्षांच्या काळात जगाला अशा प्रकारच्या २०० कोटी बाटल्यांची गरज भासणार आहे, पण एवढ्या बाटल्या उत्पादित होतील एवढी वाळू उपलब्ध आहे कि नाही याबाबत शंका व्यक्त होत आहे.

लस निर्माण झाली तरी त्याचा पुरवठा करण्यावर मर्यादा 

संयुक्त राष्ट्र एन्वायरनमेंट प्रोग्रामशी संबंधित हवामान तद्न्य पास्कल पेडूजी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जगाच्या काहीच भागात वाळूची अशी टंचाई जाणवेल सर्वत्रच फटका बसेल असे नाही पण आगामी १० वर्षे वाळूच्या निर्मिती आणि पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली संयुक्त राष्ट्र एन्वायरनमेंट प्रोग्रामने दिलेल्या माहितीप्रमाणे दरवर्षी ५० अब्ज मेट्रिक टन वाळू फक्त बांधकाम क्षेत्रात वापरली जाते.

गेल्या २० वर्षात त्यामध्ये ३०० टक्के वाढ झाली आहे परत तेवढीच वाळू निर्माण होण्यास २ ते ३ वर्षांचा काळ लागू शकतो वाळूचा वापर मर्यादित व्हावा म्हणून आता राख, कचरा , प्लास्टिक यांचा वापर करण्यावर भर दिला जावा असे सुचवण्यात आले आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

नदीत टाकलं जाळं, ओढल्यानंतर दिसली मगर

Team webnewswala

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी Reliance Foundation ची USAID सोबत भागिदारी

Team webnewswala

राजस्थानमध्ये दिवाळी फटाक्यांविनाच होणार साजरी

Team webnewswala

Leave a Reply