Team WebNewsWala
शहर

भाडेवाढीचा मिटर डाऊन, मुंबईत रिक्षा टॅक्सी ची भाडेवाढ

मुंबईत रिक्षा व टॅक्सीच्या दरात तीन रुपयांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली.

मुंबई : मुंबईत रिक्षा व टॅक्सी दरात तीन रुपयांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे.

१ मार्चपासून ही भाडेवाढ लागू

या निर्णयानुसार आता टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये तर, रिक्षाचे भाडे १८ रुपयांवरून २१ रुपये झाले आहे. १ मार्चपासून ही भाडेवाढ लागू होणार असुन, ३१ मे पर्यंत कार्डनुसार हे भाडं आकारता येणार असल्याचं परब म्हणाले आहेत. तसेच, मुंबई एमएमआर रिजनमध्ये ही भाडेवाढ लागू असणार असल्याचही त्यांनी सांगितलं आहे.

भाडेवाढीने ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक ना दिलासा

परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात सुरू असलेल्या दर वाढीमुळे ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात होत्या. मात्र भाडेवाढीने त्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.

भाडेवाढीच्या निर्णयासंदर्भात माहिती देताना अनिल परब म्हणाले, खटुआ समितीच्या शिफारशीनुसार एमएमआर रिजनमधील रिक्षा टॅक्सीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

अहमदाबाद पाठोपाठ मुंबईत सापडला Monolith मोनोलिथ

Web News Wala

चौथ्यांदा दंड झाल्यास लायसन्स रद्द

Team webnewswala

पश्चिम रेल्वेवर 7 AC लोकल प्रवाशांच्या सेवेत

Team webnewswala

Leave a Reply