Team WebNewsWala
अर्थकारण तंत्रज्ञान राष्ट्रीय

रिझर्व्ह बँकेचा QR Code साठी नवा नियम

आता केवळ आपल्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या एक्सक्लुझिव्ह क्यूआर कोडचा (exclusive qr code) वापर करण्यास परवानगी नसणार आहे.

मुंबई: पेटीएम (paytm), फोनपे (phonepe), गुगल पे (google pay), अँमेझॉन पे (amazon pay) आणि अन्य पेमेंट सिस्टम ऑपरेटर्स (पीएसओ) (payment system operators) आता केवळ आपल्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या एक्सक्लुझिव्ह क्यूआर कोडचा (exclusive qr code) वापर करण्यास परवानगी नसणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने गुरूवारी पेमेंट देण्याघेण्यासाठी कोणताही नवा क्यूआर कोड लाँच करण्यापासून पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्सना रोखले आहे.

सध्या दोन इंटरऑपरेबल क्यूआर कोड आहेत. – यूपीआय क्यूआर आणि भारत क्यूआर. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट्स अँप्सना सांगितले की ३१ मार्च २०२२ पर्यंत इंटरऑपरेबल क्यूआर कोड एक अथवा अधिकमध्ये शिफ्ट करू शकतात.

आरबीआयने आदेश दिले आहे की कोणत्याही पेमेंट देण्याघेणयासाठी क्यूआर कोड लाँच केला जाणार नाही. नव्या निर्णयासह ग्रहक यूपीआय पेमेंटला सपोर्ट करणाऱ्या अँपवरून कोणत्याही प्लॅटफॉर्मवर भरणा करू शकतात. अनेक पीएसओनी याआधी इंटरऑपरेबल क्यूआर कोड लागू केले होते.

सध्या यूपीआय क्यूआर आणि भारत क्यूआर सुरू

मात्र त्यानंतरही काही असे होते जे देण्याघेण्याच्या व्यवहारासाठी एक्सक्लुझिव्ह क्यूआर कोडचा वापर करत होते. केंद्रीय बँकेने पुढे म्हटले आह की सध्या दोन इंटरऑपरेबल क्यूआर कोड- यूपीआय क्यूआर आणि भारत क्यूआर सुरू राहतील. आणि पीसीओ इंटरऑपरेबल क्यूआर कोडबाबत जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. यात असंही म्हटलंय की इंटरऑपरेब क्यूआर कोडला स्टँडर्डाईज ठेवण्यासाठी आणि अधिक चांगले बनवण्यासाठी एक प्रक्रिया जी कमिटीकडून लाभदायक असलेल्या सुविधा सक्षम करण्यासाठी सुरू राहील.

QR Code: आरबीआयने क्यूआर कोडसाठी नवा नियम बनवला आहे. पेटीएम, फोनपे, गुगल पे, अँमेझॉन पे आणि अन्य पेमेंट सिस्टम ऑपरेर्स आता एक्सक्लुझिव्ह क्यूआर कोडचा वापर करू शकत नाही.

शिफारशी आणि मिळालेल्या फीडबॅकमधून हा निर्णय घेण्यात आला
  1. यूपीआय क्यूआर आणि भारत क्यूआर दोन इंटरऑपरेबल क्यू आर कोड सध्या सुरू राहतील.
  2. पेमेंट सिस्टीम ऑपरेटर (PSO) जे QR Code चा वापर करत आहे ते एक अथवा अधिक इंटरऑपरेबल क्यूआर कोडमध्ये स्थानांतरित होतील. ही प्रक्रिया ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होईल.
  3. यासाठी कोणताही नवा मालकी क्यूआर कोड कोणत्याही पेमेंटसाठी कोणत्याही पीएसओद्वारा लाँच केला जाणार नाही.
  4. आरबीआय लाभदायी सुविधांना सक्षम कण्यासाठी इंटरऑपरेबल क्यूआर रोडचे मानकीकृत आणि चांगले बनवण्यासाठी एक प्रक्रिया चालू ठेवणार आहे.
  5. पीएसओ इंटरऑपरेबल क्यूआर कोडबाबत जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात.
डिजीटल इंडिया मिशनला प्रोत्साहन

भारतीय रिझर्व्ह बँकेने याआधी भारतात क्यूआर कोडच्या सध्या सिस्टीमच्या समीक्षेसाठी आणि इंटरऑपरेबल क्यूआर कोडच्या दिशेने वाढवण्यासाठी समिती स्थापन केली होती. भारतात यूपीआय पेमेंट गेल्या दोन वर्षात वेगाने वाढले आहे. ज्यामळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडिया मिशनला एक प्रकारचे प्रोत्साहन मिळाले आहे

भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार यूपीआयच्या देण्या-घेण्याच्या व्यवहारात १३ पटीने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१८ आणि आर्थिक वर्ष २०२० दरम्यान देण्याघेण्याचे मूल्य २० पटींनी वाढले. ऑगस्ट २०२०मध्ये नीती आयोगचे सीईओ अमिताभ कांत यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले होते की वर्षाला १८ बिलियनची देवाणघेवाण करणाऱ्या यूपीआयने अँमेक्सला ८ बिलियननी वाढवले आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Corona Vaccination: एँटीबॉडी तयार झाल्या नाहीत; व्यापाऱ्याकडून पोलीस तक्रार

Web News Wala

पहिल्याच दिवशी Income Tax ची Website Crash

Web News Wala

HyperCharge फास्ट चार्जिंग सपोर्ट 8 मिनिटात फोन पूर्ण चार्ज

Web News Wala

Leave a Reply