आरोग्य व्यापार समाजकारण

रिलायन्स : कर्मचारी आणि कुटुंबीयांचे मोफत लसीकरण

लसीकरण मोहिमेच्या तिसऱया टप्प्यात रिलायन्स उद्योग समूहाने आपल्या कंपनीत काम करणारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिलायन्स करणार कर्मचारी आणि कुटुंबीयांचे मोफत लसीकरण

Webnewswala Online Team – देशभरात सध्या कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली आहे. या लसीकरण मोहिमेच्या तिसऱया टप्प्यात रिलायन्स उद्योग समूहाने आपल्या कंपनीत काम करणारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नीता मुकेश अंबानी यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. रिलायन्स कंपनीतील सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या लसीकरणाचा सर्व खर्च कंपनी करणार आहे. ज्या कर्मचाऱयांना व्हॅक्सिन घ्यायचे आहे त्यांनी सरकारी पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 15 जूनपर्यंत सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट रिलायन्स कंपनीने ठेवले आहे.

रिलायन्सच्या ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर्समध्ये (Occupational Health Centers) या उपक्रमांतर्गत लसीकरण केले जाणार आहे. त्याशिवाय 800 हून अधिक शहरांमध्ये असलेली रिलायन्सची हॉस्पिटल्स तसेच अपोलो, मॅक्स, मणिपाल अशा पार्टनर हॉस्पिटल्समध्येही हे लसीकरण केले जाणार आहे.

Web Title – रिलायन्स करणार कर्मचारी आणि कुटुंबीयांचे मोफत लसीकरण ( Reliance will provide free vaccinations to employees and families )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

आधार क्रमांक किती वेळा वापरले आहे तपासा मोबाईल वरून

Web News Wala

२१ डझन हापूस लंडनला निर्यात पहिल्या पेटीला ५१ पौंड दर

Web News Wala

CoronaVirus News ‘या’ देशात झाला कोरोनाचा अंत

Web News Wala

Leave a Reply