आंतरराष्ट्रीय पर्यावरण

रिलायन्स उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय

कापड, टेलिकॉम श्रेत्रांमध्ये असणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आता गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय उभारणार

जामनगर : कापड, टेलिकॉमबरोबरच अनेक श्रेत्रांमध्ये असणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आता गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय उभारणार आहे. हे प्राणी संग्रहालय गुजरातमधील जामनगर येथे उभारण्यात येणार आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.

रिलायन्सच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या प्राणीसंग्रहालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी तसेच सपरटणारे प्राणीही पर्यटकांना पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील वेगेगवेळ्या भागांमधील प्राणी या संग्रहालयामध्ये असतील असं सांगण्यात आलं आहे.

हे प्राणीसंग्रहालय २८० एकर परिसरावर निर्माण केलं जाणार आहे. जामनगरमधील मोती खावेडी येथे रिलायन्सचा रिफायनरी प्रोजेक्ट आहे. या ठिकाणापासूनच जवळच हे प्राणीसंग्रहालय उभारलं जाणार आहे. रिलायन्सचा हा रिफायनरी प्रोजेक्ट जगातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. येथून रिलायन्स समुहाचा पेट्रोकेमिकल्समधील सर्व व्यवसाय चालतो.

या प्राणीसंग्रहालयाच्या कामामध्ये कोणताही अडथळा आला नाही तर पुढील दोन वर्षांमध्ये हे तयार करुन लवकरात लवकर पर्यटकांसाठी खुलं करण्यात येईल. यंदाच्या वर्षी करोनामुळे या प्राणीसंग्रहालयाचे फारसं काम होऊ शकलेलं नाही. त्यामुळे अशी संकटं आली नाहीत आणि काम सुरळीत सुरु राहिलं तर २०२२ पर्यंत हे प्राणीसंग्रहालय सुरु करण्यात येईल.

या प्राणीसंग्रहलायचं नाव ग्रिन्स झुओलॉजिकल, रेस्क्यू अ‍ॅण्ड रिहॅबिटेशन किंग्डम असं असणार आहे, अशी माहिती रिलायन्सच्या कॉर्परेट अफेअर्सचे विभागाचे संचालक असणारा परिमल नथवानी यांनी दिली.

> दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया प्रांतामधील नॅशनल झुओलॉजिकल गार्डन्स ऑफ आफ्रिका हे प्राणीसंग्रहालय २१० एकरांवर परसलेलं आहे. या ठिकाणी नैसर्गिक आवास आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असून हे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

> युनायटेड किंग्डममधील लंडन प्राणीसंग्रहालय हे जगातील सर्वात मोठ्या प्राणीसंग्रहालयांबरोबरच जगातील सर्वात जुने वैज्ञानिक दृष्टीकोनामधून उभारण्यात आलेलं प्राणीसंग्रहालय आहे. या संग्रहालयाची स्थापना १८२८ मध्ये करण्यात आली. ३६ एकरांवर असणाऱ्या या प्राणीसंग्रहालयामध्ये २० हजार प्राणी आहेत.

> अमेरिकेतील सॅन डिअ‍ॅगो प्राणीसंग्रहालय हे कॅलिफॉर्निया राज्यात आहे. या प्राणीसंग्रहालयामध्ये पांडांचे संवर्धन केलं जातं. हे जगातील सर्वात चांगल्या प्राणीसंग्रहालयांपैकी एक आहे. हे संग्रहालय १०० एकरांवर पसरलेलं आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कांजूरमार्ग मेट्रो कारशेड पर्यावरणवाद्यांचा विरोध

Team webnewswala

मंदीत Smartphone मार्केटमध्ये चांदी

Web News Wala

लवकरच भारतीय महिला IPL ची घोषणा – BCCI

Team webnewswala

Leave a Reply