Team WebNewsWala
आरोग्य राष्ट्रीय

CoWIN app Download करण्यापूर्वी ही बातमी वाचाच

लसीकरणासाठी आरोग्य मंत्रालयाकडून कोविन CoWIN app प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले असून त्या प्लॅटफॉर्मवर लसीकरणापूर्वी नोंदणी करण्यात येणार आहे.

मुंबई : कोरोना लसींना (Corona Vaccine) आपत्कालीन वापरासाठी भारतात मंजुरी देण्यात आली असून आता लवकरच कोरोना लसीकरणाला (Corona Vaccination) सुद्धा सुरुवात होणार आहे. कोरोना लसीकरणाची संपूर्ण देशभरात तयारी सुरु आहे. लसीकरणासाठी आरोग्य मंत्रालयाकडून कोविन CoWIN app प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले असून त्या प्लॅटफॉर्मवर लसीकरणापूर्वी नोंदणी करण्यात येणार आहे. मात्र, असे असताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागरिकांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

CoWIN app नावाची अनेक फेक अँप प्ले स्टोर वर
लसीकरणासाठी आरोग्य मंत्रालयाकडून कोविन CoWIN app प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले असून त्या प्लॅटफॉर्मवर लसीकरणापूर्वी नोंदणी करण्यात येणार आहे.

कोरोना लसीकरणासाठी, वितरण, तसेच लसीकरणाची संपूर्ण माहिती कोविन Co-WIN या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे. हे प्लॅटफॉर्म अद्याप सरकारकडून अधिकृतपणे सुरू करण्यात आलेले नाहीये मात्र, त्यापूर्वी तसेच काही मोबाइल अॅप उपलब्ध झाले आहेत. अशा बनावट मोबाइल अँप किंवा प्लॅटफॉर्म पासून सावध राहण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. या बनावट प्लॅटफॉर्मवरुन तुमची वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते तसेच तुम्हाला मोठा आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ट्विट करत म्हटल, “कोरोना लसीकरणासाठी सरकारकडून अधिकृतपणे CoWIN app प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून त्यासारखेच अनेक बनावट अँप प्लेस्टोअर वर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे असे बनावट अँप डाऊनलोड करु नका.”

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सोशल मीडिया वापरासाठी, केंद्र सरकारची नियमावली जाहीर

Web News Wala

नैराश्यावर मात करा एक मिनिटाच्या फिल्ममध्ये उपाय

Team webnewswala

Tearm insurance घेताना या १० महत्वपूर्ण चुका टाळा

Web News Wala

Leave a Reply