मनोरंजन समाजकारण

Ranu Mondal पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री दीपिका चिखलिया या लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान आता या चित्रपटातील एक गाणे Ranu Mandal गाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे.

अभिनेत्री दीपिका चिखलिया या लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान आता या चित्रपटातील एक गाणे Ranu Mondal गाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे.

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या पौराणिक मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया या लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट सरोजिनी नायडू यांच्या जीवनावर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात दीपिका या सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

नुकताच दीपिका यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. ‘माझा चित्रपट सरोजिनी या मधील धीरज मिश्रा यांनी लिहिलेले गाणे रानू मंडल गाणार आहेत’ या आशयाचे ट्विट करत दीपिका यांनी माहिती दिली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून Ranu Mandal पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

सरोजिनी नायडू या चित्रपटाची ऑफर

इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये दीपिका यांनी या चित्रपटाबाबत वक्तव्य केले होते. ‘मला सरोजिनी नायडू या चित्रपटाची ऑफर आली आहे. पण मी अद्याप चित्रपट साइन केलेला नाही. चित्रपटाची कथा ही धीरज मिश्रा लिहिणार असून दिग्दर्शन देखील तेच करणार आहेत. पण लॉकडाउनमुळे मी चित्रपटाची कथा ऐकलेली नाही. लॉकडाउननंतर आम्ही एकत्र भेटू आणि चित्रपटाशी संबंधीत विषयांवर चर्चा करु’ असे दीपिका यांनी म्हटले होते.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

जगातील सर्वात मोठी विमानवाहू युध्दनौका INS विराट 100 कोटीस विकण्यास तयार

Team webnewswala

स्वप्निल बांदोडकर चा ती रसिकांच्या भेटीला

Team webnewswala

MumUni School of Thoughts तर्फे प्रा चौधरी यांचे अंतर्मुख करणारे व्याख्यान

Team webnewswala

Leave a Reply