Team WebNewsWala
पर्यावरण

राजापुर मध्ये विहिरीत पडलेल्या रानगव्याला जीवनदान

राजापूर वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने रात्रीच विहिरीतून सुखरुप बाहेर काढून रानगव्याला जीवनदान दिले.
राजापुर मध्ये विहिरीत पडलेल्या रानगव्याला जीवनदान

ही विहीर सुमारे बारा ते पंधरा फूट खोल असून, आतमध्ये तीन फूट पाणी असल्याने गव्याला बाहेर काढणे अवघड होते. त्यानंतर खोदलेल्या विहिरीत दगड टाकून आत अडकून पडलेल्या गव्याला बाहेर येण्यासाठी योग्य असा मार्ग बनविण्यात आला. हे काम सुरू असतानाच रानगवा आक्रमक होऊन तेथे असलेल्या मंडळींच्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करीत होता. त्यानंतर तयार केलेल्या त्या पर्यायी मार्गाद्वारे आत पडलेला रानगवा विहिरीतून वर आला आणि जंगलाच्या दिशेने निघून गेला.

एका बाजूने खोदकाम

गव्याला बाहेर काढण्यासाठी जेसीबी बोलावण्यात आला. मात्र, जेसीबी येण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले कर्मचारी व तेथे आलेल्या ग्रामस्थांसह त्या विहिरीच्या एका बाजूने खोदण्यास सुुरूवात केली.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मुंबईत इथून पुढे देशी झाडांचीलागवड

Web News Wala

सिंधुदुर्ग किल्ल्याला तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा

Web News Wala

पर्यावरण दिन श्रीलंकेजवळ बुडतंय रसायनांनी भरलेलं जहाज

Web News Wala

Leave a Reply