Team WebNewsWala
Other राजकारण राष्ट्रीय

लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचे निधन

रामविलास पासवान यांचे निधन

केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचे आज संध्याकाळी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीत रुग्णालयात उपचार सुरू होते. रामविलास यांचा मुलगा चिराग पासवान यांनी आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती ट्विट करून दिली.

‘बाबा… तुम्ही या जगात नाहीत पण मला माहीत आहे की तुम्ही जिथे कुठे आहात सदैव माझ्यासोबत आहात’, असे चिराग पासवान यांनी ट्विट केले आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळात अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि ग्राहक कल्याण मंत्री असलेले पासवान ८ वेळा लोकसभेमध्ये निवडून आले होते आणि सध्या राज्यसभेचे सदस्य होते.

१९६९ मध्ये संयुक्त समाजवादी पक्षातर्फे बिहार विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आलेले पासवान नंतर १९७४ मध्ये लोक दलात सहभागी झाले. आणीबाणीला विरोध केल्याने ते तुरुंगात होते. १९७७ मध्ये जनता पक्षातून ते हाजीपूर मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले. १९८०, ८९, ९६ आणि १९९८, २००४, २०१४ मध्ये खासदार म्हणून निवडून गेले होते.

२००० साली पासवान यांनी लोक जनशक्ती पक्षाची स्थापना केली. आणि २२०४ मध्ये युपीए सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्री म्हणून सहभागी झाले. २०१४ मध्ये ते नरेंद्र मोदी मंत्रीमंडळात सहभागी झाले आणि २०१९ मध्येही ते मोदी मंत्रीमंडळात मंत्री झाले.

 

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Bajaj Auto ने बंद केली Bajaj Chetak इलेक्ट्रिक ची बूकिंग

Team webnewswala

Petrol and Diesel Price 32 दिवसांत 18 व्या वेळेस इंधन दरवाढ

Web News Wala

ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि पन्हाळ गड पर्यटकांसाठी खुला

Team webnewswala

Leave a Reply