Team WebNewsWala
व्यापार

रामदेव बाबांची रुचि सोया गुंतवणुकदार मालामाल

रुचि सोया ची मालकी आता बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदकडे आहे. मागील काही महिन्यात रुचि सोया शेअरच्या किंमत जबरदस्त वाढ होत गुंतवणुकदार मालामाल झाले

रामदेव बाबांची रुचि सोया गुंतवणुकदार मालामाल

Webnewswala Online Team –  रुचि सोया इंडस्ट्रीज (Ruchi Soya). ही एक एफएमसीजी कंपनी (FMCG) असून खाद्यतेल, पोषक आधार, पेय इत्यादी विविध उत्पादनांच्या श्रेणीत रुचि सोयाचा व्यवसाय आहे. रुचि सोया कर्जाच्या विळख्यात अडकल्यानंतर मागील वर्षीच रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदने रुचि सोयाचे अधिग्रहण केले होते. म्हणजेच रुचि सोयाची मालकी आता बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदकडे आहे. मागील काही महिन्यात रुचि सोयाच्या शेअरच्या (Share of Ruchi Soya) किंमत जबरदस्त वाढ होत गुंतवणुकदार मालामाल झाले आहेत.

रुचि सोया शेअरने दिला ९६ टक्क्यांचा परतावा

३१ मार्च २०२१ला रुचि सोयाच्या शेअरची किंमत ६४१.३५ रुपये प्रति शेअर इतकी होती. आज रुचि सोयाचा शेअर अप्पर सर्किट लागून ५ टक्क्यांनी वधारला होता. रुचि सोयाच्या शेअरची किंमत आता १,२५४.०५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचली आहे. सलग दिसऱ्या दिवशी रुचि सोयाच्या शेअरला अप्पर सर्किट लागले आहे. सध्या हा शेअर गुंतवणुकदारांना आकर्षिक करत असल्यामुळे शेअरला अप्पर सर्किट लागले आहे. मागील फक्त दोनच महिन्यात रुचि सोयाच्या शेअरच्या किंमतीत ९६ टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. त्यामुळे फक्त दोनच महिन्यात रुचि सोयाच्या गुंतवणुकदारांचे पैसे जवळपास दुप्पट झाले आहेत. जेव्हा एखाद्या शेअरला विकत घेणारे जास्त असतात आणि विकणारे फारच थोडे, तेव्हा त्या शेअरची किंमत जबरदस्त वाढत जाते. ती एका दिवसात, किंवा काही तासात विशिष्ट पातळीच्या वर वाढली की त्या शेअरची खरेदी-विक्री थांबवण्यात येते आणि पुढील दिवशी पुन्हा व्यवहार खुले केले जातात.

एका वर्षात रुचि सोयाच्या शेअरच्या किंमतीत ७३ टक्क्यांची वाढ

मार्चअखेर रुचि सोयाचे बाजारमूल्य १८,९७३.७६ कोटी रुपये इतके होते. फक्त दोनच महिन्यात रुचि सोयाचे बाजारमूल्य १८,१२६ कोटी रुपयांनी वाढून ३७,०९९ कोटी रुपयांवर पोचले आहे. मागील आठवड्यात बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचा शेअर १,१९४.३५ रुपये प्रति शेअर या पातळीवर होता. त्यात आज २.८ टक्क्यांची वाढ होऊन शेअरची किंमत १,२२७.८५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचला आहे. रुचि सोयाचा शेअर आतापर्यतच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार करतो आहे. मागील एका वर्षात रुचि सोयाच्या शेअरच्या किंमतीत ७३ टक्क्यांची घवघवीत वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरने जानेवारीपासून आतापर्यत ८५.८५ टक्के वाढ नोंदवली आहे.

काय कारण आहे रुचि सोया शेअरमध्ये तेजी येण्याचे ?

रुचि सोयाच्या शेअरच्या किंमतीत वाढ होण्यामागे काही कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे कंपनी लवकरच १०० टक्के शाकाहारी, प्रिझर्व्हेटीव्ह फ्री उत्पादने बाजारात आणणार आहे. त्यातून कंपनीला चांगलीच कमाई होण्याचे अंदाज आहेत. दुसरे कारण म्हणजे रुचि सोयाचा आयपीओ लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. एखाद्या कंपनीचा आयपीओ बाजारात येतो म्हणजे त्या कंपनीचे काही शेअर सर्वसामान्य गुंतवणुकदारांसाठी खुले केले जातात. तिसरे कारण म्हणजे बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदच्या बिस्किट व्यवसायाचे म्हणजेच पतंजली नॅचरल बिस्किट्स प्रा. लि. (पीएनबीपीएल) या कंपनीचे रुचि सोयाने १० मे ला फक्त ६० कोटी रुपयांमध्ये अधिग्रहण केले होते. त्यामुळे रुचि सोयाच्या महसूलात चांगलीच वाढ झाली आहे. या कारणांमुळे रुचि सोयाकडे गुंतवणुकदार आकृष्ट होत असून कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून येते आहे.

पतंजली बिस्किट्सचे अधिग्रहण आणि पुन्हा तेजी

११ मे ला रुचि सोया इंडस्ट्रीजने पतंजली बिस्किट्सच्या व्यवसायाचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली होती. १० मे ला कंपनीच्या संचालक मंडळाने या व्यवहाराला मंजूरी दिली होती. त्या दिवशी रुचि सोयाचा शेअर ७५९.७० रुपये प्रति शेअरवर होता. त्यानंतर रुचि सोयाने पतंजलीच्या बिस्किट्स व्यवसायाला विकत घेतल्याची बातमी आली आणि रुचि सोयाच्या शेअरची किंमतीत मोठी तेजी आली. २५ मेपर्यत या शेअरच्या किंमतीत ४८ टक्क्यांची दणदणीत वाढ झालेली होती आणि हा शेअर १,१२६ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचला होता.

Web Title – रामदेव बाबांची रुची सोया गुंतवणुकदार मालामाल ( Ramdev Baba’s interest in soy investor goods )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

बिग बास्केट खरेदी करत टाटा देणार रिलायन्स ला टक्कर

Web News Wala

Zerodha चे कामत बंधू घेणार Infosys CEO पेक्षाही अधिक वेतन

Web News Wala

व्होडाफोन-आयडिया चे दोन ‘पॉप्युलर’ प्लॅन्स महाग

Team webnewswala

Leave a Reply