Team WebNewsWala
मनोरंजन राजकारण राष्ट्रीय

रजनीकांत आज मोठी घोषणा करण्याची शक्यता

गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तेथील राजकारणात निवडणुकीसंबंधी हालचाल वाढू लागल्याचं दिसत आहे. दरम्यान रजनीकांत निवडणूक लढवणार का ? अशी चर्चा

तामिळनाडू : तामिळनाडूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तेथील राजकारणात निवडणुकीसंबंधी हालचाल वाढू लागल्याचं दिसत आहे. दरम्यान यावेळी अभिनेता रजनीकांत निवडणूक लढवणार का ? अशी चर्चा रंगली आहे. यामागचं कारण म्हणजे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी चेन्नई येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत लवकरच आपल्या राजकीय पक्षाची भूमिका ठरवत २०२१ मध्ये होणारी तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करु शकतात.

रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रीय

तामिळनाडूमधील सर्व राजकीय पक्षांची नजर सध्या रजनीकांत काय घोषणा करतात याकडे लागली आहे. बैठकीनंतर रजनीकांत निवडणूक लढणार की नाही यासंबंधी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. रजनीकांत यांनी आपण सर्वात आपला पक्ष रजनी मक्कल मंडरमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून त्यानंतरच निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं.

रजनीकांत आणि कमल हासन यांनी एकत्रित काम करण्याची इच्छा

रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. मात्र अधिकृतपणे त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. गतवर्षी अभिनेता रजनीकांत आणि कमल हासन यांनी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही पक्ष युती करतील अशी शक्यता वर्तवली जात होती.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

रिझर्व्ह बँकेचा QR Code साठी नवा नियम

Team webnewswala

राजस्थानमध्ये दिवाळी फटाक्यांविनाच होणार साजरी

Team webnewswala

कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात, पण मृतांचा आकडा चिंता वाढवणारा

Web News Wala

Leave a Reply