Other मनोरंजन

‘Annathe’ सेटवर ८ करोना बाधीत रजनीकांत क्वारंटाइन

यामध्येच आता दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या Annathe या चित्रपटाच्या सेटवर ८ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

हैदराबाद : गेल्या कित्येक महिन्यांपासून देशावर असलेलं करोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही. जवळपास १ कोटींच्यापार करोनाबाधितांचा आकडा पोहोचला आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. यात सामान्यांपासून कलाविश्वापर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच आता दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या Annathe या चित्रपटाच्या सेटवर ८ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्याचसोबत आता रजनीकांतदेखील क्वारंटाइन झाल्याचं सांगण्यात येत आहे.

‘इंडिया टुडे’ नुसार, रजनीकांत सध्या त्यांच्या आगामी Annathe या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीमध्ये १४ डिसेंबरपासून हे चित्रीकरण सुरु होतं. मात्र, सेटवर ८ जण करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हे चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे.

रजनीकांत हे हैदराबादमध्ये क्वारंटाइन

“चित्रपटाच्या सेटवर उपस्थित लोकांपैकी ८ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हे चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. तसंच रजनीकांत हे हैदराबादमध्ये क्वारंटाइन होतील किंवा चेन्नईलादेखील परत येऊ शकतात”, असं रजनीकांत यांचे प्रवक्ते रियाज अहमद यांनी सांगितलं.

आतापर्यंत कलाविश्वातील अनेक दिग्गजांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यात बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, अभिषेक बच्चन, आराध्या बच्चन यांनाही करोनाची लागण झाली होती.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Big Boss मुळे रातोरात पालटलं शहनाज गिल चं नशीब

Team webnewswala

१ ऑक्टोबरपासून नवे बदल होणार गॅस सिलेंडरपासून आरोग्य विम्यापर्यंत

Team webnewswala

विराट तमन्नाला अटक करा; मद्रास उच्च न्यायालयात याचिका

Team webnewswala

Leave a Reply