Team WebNewsWala
Other मनोरंजन

राहत इंदौरी यांची बॉलिवूडमधील हिट गाणी

आपल्या अफलातून शेरो-शायरीसाठी प्रसिद्ध असलेल्या राहत इंदौरी यांनी बॉलिवूडमधील काही हिट गाणी लिहिली होती. ही गाणी ९०च्या दशकात अतिशय लोकप्रिय ठरली होती.

जगातील सर्वोत्कृष्ट गझलकारांपैकी एक राहत इंदौरी यांचे काल ११ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ७० वर्षांचे होते.आपल्या अफलातून शेरो-शायरीसाठी प्रसिद्ध असलेल्या राहत इंदौरी यांनी बॉलिवूडमधील काही हिट गाणी लिहिली होती. ही गाणी ९०च्या दशकात अतिशय लोकप्रिय ठरली होती. चला जाणून घेऊया या गाण्यांबद्दल..

‘मिशन कश्मीर’ या चित्रपटातील ‘बुम्बरो’ हे गाणे राहत इंदौरी यांनी लिहिले होते. या गाण्यात प्रिती झिंटा आणि हृतिक रोशन मुख्य भूमिकेत आहेत. हे गाणे तेव्हा अतिशय हिट झाले होते.

‘इश्क’ चित्रपटातील ‘देखो देखो जानम हम’ हे गाणे अतिशय लोकप्रिय गाणे आहे. या चित्रपटात आमिर खान, अजय देवगन, काजोल आणि जूही चावला मुख्य भूमिकेत आहेत.

‘हां जुदाई से डरता है दिल’ हे बॉबी देओलचे ‘हासिल’ चित्रपटातील गाणे राहत इंदौरी यांनी लिहिले होते.

नक्की वाचा >>
बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब
प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी यांचं निधन

IAS ऐश्वर्या शेरॉन फेक अकाउंट्समुळे त्रस्त पोलिसांकडे तक्रार

१९५५ साली प्रदर्शित माधुरी दीक्षित, ऋषि कपूर आणि राज बब्बर यांच्या ‘याराना’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटातील ‘लोए लोए आजा आजा माही’ हे गाणे अतिशय हिट झाले होते.

‘एम बोले तो..’ हे अतिशय लोकप्रिय गाणे मुन्नाभाई चित्रपटातील राहत इंदौरी यांनी लिहिले आहे.

‘हमेशा’ चित्रपटातील गाणे देखील राहत इंदौरी यांनी लिहिले आहे.

‘चोरी चोरी जब नजरे मिली’ हे करीब चित्रपटातील हिट गाणे राहत इंदौरी यांनी लिहिले आहे.

राहत इंदौरी यांचे शेर अतिशय लोकप्रिय होते. काही महिन्यांपूर्वी राहत यांचा ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हा शेर खूप चर्चेत होता. सोशल मीडियावर या शेरने अक्षरशः धुमाकूळच घातला होता.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

SBI करतेय लिलाव; खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट

Team webnewswala

झाडाखाली शाळा घेणाऱ्या शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार

Team webnewswala

अयोध्येनंतर पेटणार मथुरेचा श्रीकृष्ण जन्मभूमी वाद

Team webnewswala

Leave a Reply