Team WebNewsWala
आरोग्य राष्ट्रीय व्यापार

पुण्याची ‘सीरम’ आता बनवणार स्फुटनिक V लस

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) काही दिवसातच Sputnik-V तयार करू शकते. या लसीच्या परवान्यासाठी सीरम संस्थेनं (DCGI) कडे मागितली परवानगी

पुण्याची ‘सीरम’ आता बनवणार स्फुटनिक V लस

Webnewswala Online Team – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) येत्या काही दिवसातच भारतात रशियन स्पुटनिक लस (Sputnik-V) तयार करू शकते. या लसीच्या उत्पादनासाठी चाचण्यांच्या परवान्यासाठी सीरम संस्थेनं ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे परवानगी मागितली आहे. वृत्तसंस्था एएनआयनं आपल्या सूत्रांकडून ही माहिती दिली आहे.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्रोजेनका यांच्या सहकार्यानं कोविशिल्ड बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटनं आता Sputnik-V चाचणी विश्लेषण आणि परीक्षणासाठी अर्ज केला आहे. स्पुटनिक-व्ही या लसीला देशात सध्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियानं मान्यता दिली आहे. सध्या डॉ. रेड्डीज प्रयोगशाळांमध्ये स्पुटनिकची निर्मिती केली जात आहे.

सरकारने 30 कोटी डोसचे आदेश दिले

देशात आपात्कालीन वापरासाठी रशियाच्या स्पुटनिक-व्ही या लसीची 12 एप्रिल रोजी नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर 14 मे पासून या लसीचा वापर सुरू करण्यात आला. आरडीआयएफ आणि पॅनासिआ बायोटेक यांनी स्पुटनिक व्ही लसीचे वर्षाला 10 कोटी डोस बनवण्याविषयी सहमती दर्शवली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही लस वयस्कांमध्ये सुमारे 83 टक्के प्रभावी आहे.

एकाच डोसची रशियाची स्पुटनिक लाईट (Sputnik Light) कोविड लस वृद्ध लोकांमध्ये सुमारे 83 टक्के प्रभावी असल्याचे आढळले आहे. याबाबतची माहिती आणि आकडेवारी अर्जेंटिनामधून गोळा केली गेली आहे. ब्युनस आयर्स प्रांताच्या आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, स्पुटनिक लाइट वृद्धांमध्ये 78.6 ते 83.7 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आलं आहे.

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडकडून (आरडीआयएफ) याबाबत माहिती दिली आहे. कोविड-19 विरोधी रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीची ही नवीन आवृत्ती आहे, या लसीला मे महिन्यातच मान्यता देण्यात आली आहे. त्यावेळी आरडीआयएफने स्पुटनिक व्हीच्या दोन डोसपेक्षा एक डोस असलेली लस अधिक चांगली असल्याचे म्हटले आहे.

Web Title – ‘पुण्याची ‘सीरम’ आता बनवणार स्फुटनिक V लस ( Pune’s ‘Serum’ will now make Sputnik V )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

गुगल पे येणार नव्या स्वरूपात

Team webnewswala

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेची काही लक्षणं

Team webnewswala

विराट तमन्नाला अटक करा; मद्रास उच्च न्यायालयात याचिका

Team webnewswala

Leave a Reply