Team WebNewsWala
पर्यावरण शहर

सिगल पक्षांच्या संरक्षणासाठी Yeur Environmental Society ची जनजागृती मोहीम

सिगल पक्षांच्या संरक्षणासाठी Yeur Environmental Society ची जनजागृती मोहीम. पक्ष्यांना खायला घालणे हा वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा

अतिथी देवो भव: ! भारतीय संस्कृतीत अतिथीला देव मानले जाते. अतिथी म्हणजेच पाहुणा आपल्याकडे आला कि त्याचे यथोचित आदरातिथ्य करून त्याला प्रेमपूर्वक वागवले जाते. यजमान एकवेळ स्वतःच्या खिशाला चाट लावून पाहुण्यांना चांगले खाऊपिऊ घालतो. पुन्हापुन्हा दर्शन देत रहा असा प्रेमळ निरोप देऊनच अतिथीची बोळवण केली जाते. परंतु काहीवेळेला अतिथीला या प्रेमाचा फायदा होण्यापेक्षा त्रासच जास्त होऊ शकतो. त्यामुळे सामान्य नागरिकांनी आपल्या शहरातल्या स्थलांतरित पक्ष्यांच्या रूपाने आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या आरोग्याच्या विशेष गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपली वागणूक ठेवावी.

:- रोहित जोशी, येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी

आयत्या खाण्याच्या आमिषाने येणाऱ्या कुरव पक्ष्यांमध्ये खाद्य बळकावण्यासाठी झटापटी होतात. मासुंदा तलाव शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने इथे सतत वाहनांची वर्दळ असते. वाहनांच्या धडकेने अपघात होऊन कुरव पक्षी मृत झाल्याच्या घटना घडत आहेत. तरी नागरिकांनी जबाबदारीने वागावे.

:- संगिता जाधव, मराठा जागृती मंच, ठाणे

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

रिलायन्स उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय

Web News Wala

नाशिकचा आर्यन शुक्ल ज्युनिअर मेंटल मॅथ्स स्पर्धेत विश्वविजेता

Team webnewswala

आयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी

Web News Wala

Leave a Reply