Team WebNewsWala
राजकारण शहर

500 चौरस फुटांखालील सदनिकाधारकांची निराशा भरावा लागणार मालमत्ता कर

महापालिकेच्या सर्व शाळांचे नामांतर ‘मुंबई पब्लिक स्कूल’ करण्यात आले, गतवर्षीच्या योजनांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात अधिक तरतूद करण्यात आली

पाचशे चौरस फुटांखालील सदनिकाधारकांची निराशा;  थकबाकीसह मालमत्ता कर भरण्याचे आव्हान

मुंबई : करोनाकाळात डळमळलेली आर्थिक स्थिती रुळावर आणण्यासाठी मुंबई महापालिकेने ५०० चौरस फुटांखालील सदनिधारकांकडून सर्वसाधारण कर वगळून उर्वरित कराच्या वसुलीची तयारी सुरू केली आहे. येत्या आठवडय़ाभरात लहान घरात वास्तव्यास असणाऱ्या मुंबईकरांना दोन वर्षांचा मालमत्ता कराचा भरणा करावा लागणार आहे. निवडणुकीच्या काळात शिवसेनेने दिलेल्या आश्वासनानुसार मालमत्ता कर भरावा लागणार नाही, ही मुंबईकरांची आशा धुळीस मिळाली आहे.

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने ५०० चौरस फूट आणि त्यापेक्षा लहान घरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या मुंबईकरांना मालमत्ता कर माफ करण्याची, तसेच ७०० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्यांना मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा केली होती.

दहापैकी नऊ कर थकबाकीसह भरावे लागणार

मालमत्ता कराच्या देयकात सर्वसाधारण कर, जल कर, जललाभ कर, मलनि:सारण कर, मलनि:सारण लाभ कर, पालिका शिक्षण उपकर, राज्य शिक्षण उपकर, रोजगार हमी उपकर, वृक्ष उपकर, पथकर या दहा करांचा समावेश असतो. यापैकी केवळ सर्वसाधारण कर माफ करून उर्वरित नऊ  कर लहान घरात राहणाऱ्या मुंबईकरांना भरावेच लागणार आहेत. इतकेच नव्हे तर मागील वर्षांची थकबाकीही वसूल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

५ कोटी २० लाख महसूल अपेक्षित

शिवसेनेच्या घोषणेनुसार मुंबईतील ५० चौरस फुटांपर्यंतच्या एक लाख ८० हजार सदनिकाधारकांना करमाफी मिळणार होती; परंतु आता त्यांना नऊ  कर भरावेच लागणार आहेत. या सदनिकाधारकांकडून प्रतिवर्षी सुमारे दोन कोटी ६० लाख रुपये कर पालिकेला मिळणार आहे. मागील वर्षीची थकबाकी मिळून सुमारे पाच कोटी २० लाख रुपये महसूल पालिकेला अपेक्षित आहे.

लवकरच देयके वितरण

या सदनिकाधारकांची देयके एक-दोन दिवसांत पालिकेला उपलब्ध होणार आहेत. युद्धपातळीवर त्यांचे वितरण करून करवसुलीला सुरुवात करण्यात येणार आहे. मार्च २०२१ पर्यंत महसुलाचा मोठा हिस्सा पालिकेच्या तिजोरीत जमा करण्याचे उद्दिष्ट करनिर्धारण आणि संकलन विभागाला देण्यात आले आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

दोन वर्षांपासून २४० मराठी चित्रपट अनुदानासाठी रांगेत

Team webnewswala

पर्यावरणाला घातक माशांची मांगूर पैदास

Web News Wala

कशेळी ब्रिज जवळ कंटेनर थेट पुलावरून कोसळला खाडीमध्ये

Team webnewswala

Leave a Reply