Team WebNewsWala
पर्यावरण राजकारण शहर

वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट’ साठी प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्री भेट

मिरा-भाईंदर क्षेत्रातील घोडबंदर ते जेसल पार्क खाडी किनारा ( वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट ) विकसित करण्यासाठी या आर्थिक वर्षात १५० कोटी रूपयांची तरतूद
वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट’ साठी प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्री भेट

उद्धव ठाकरे यांचाही सकारात्मक प्रतिसाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आमदार सरनाईक यांच्या मागणीला सकारात्मक  प्रतिसाद दिला आहे. मीरा भाईंदर शहरावरही आपले लक्ष असून मीरा भाईंदरसह ठाणे जिल्हा, कल्याण डोंबिवली , वसई येथील खाडी किनारा विकास , जलवाहतूक यासाठीही सरकार प्राधान्य देईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. खाडी किनारा विकासासाठी राज्याच्या बजेटमध्ये तरतूद होईल असा विश्वास असून भविष्यात मीरा भाईंदर – ठाणे – वसई – मुंबई अशी जलवाहतूक वाढेल. तसेच खाडी किनारा विकसित केल्यास पर्यटकांच्या दृष्टीने व शहरातील नागरिकांनाही या विकसित झालेल्या खाडी किनाऱ्यावर हक्काने चार निवांत क्षण घालवता येतील. त्यामुळे किनाऱ्याचा विकास व जलवाहतूक यासाठी आपला सरकारकडे पाठपुरावा सुरु राहील , असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

पालिकेकडून तयार होणार आराखडा

मीरा- भाईंदर शहर तीन बाजूंनी खाडीने वेढले गेले आहे. त्यामुळे मीरा भाईंदरचा खाडी किनारा विकसित व्हावा अशी आमदार सरनाईक यांची मागणी आहे. त्यांच्या मागणीनंतर याबाबत मीरा भाईंदर महापालिकाही खाडी किनारा विकासाबाबत एक सादरीकरण (प्रेझेन्टेशन) तयार करणार असल्याचे कळते.

‘वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट’साठी सरनाईक आग्रही 

‘वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट’ साठी सरनाईक आग्रही राहिले आहेत. रस्ते वाहतुकीवर दिवसेंदिवस ताण वाढत आहे. त्यामुळे जलवाहतूक व खाडी किनारा विकास व्हायलाच हवा. सरनाईक यांच्या मागणीनंतर मीरा भाईंदर पालिका आयुक्तांनीही या मागणीवर कार्यवाही सुरु केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी पालिकेचे कन्सल्टन्ट नितीन कुलकर्णी यांना खाडी किनारा व ‘वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट’चा आरखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. मीरा भाईंदरचा खाडी किनारा कशापद्धतीने विकसित होऊ शकतो , त्यात कोणते प्रकल्प होतील याबाबतचा अभ्यास करून हा आराखडा बनेल , अशी माहिती सरनाईक यांच्याकडून देण्यात आली.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मुंबई विद्यापीठाची परीक्षा १ ते १७ ऑक्टोबरदरम्यान

Team webnewswala

डोंबिवली महानगर गॅस वहिनीसाठी खोदकाम करताना दुर्घटना

Web News Wala

पद्म पुरस्कार समिती अध्यक्षपदी आदित्य ठाकरे

Team webnewswala

Leave a Reply