Other तंत्रज्ञान नोकरी राष्ट्रीय समाजकारण

पवई IIT चा ‘बोधीट्री’ आता सर्वांना उपलब्ध

पवई IIT चा ‘बोधीट्री’ आता सर्वांना उपलब्ध करून दिला असुन या बोधीट्री चा वापर देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षकांना विनामुल्य

कोरोना लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिकवणीशिवाय पर्याय उरला नाही. परंतु त्यासाठी मोजकेच पर्याय उपलब्ध होते. मुंबईतील पवई IIT संशोधकांनी त्यात बोधीट्री या नव्या पर्यायाची भर घातली आहे. पवई IIT चा ‘बोधीट्री’ आता सर्वांना उपलब्ध करून दिला असुन या बोधीट्रीचा वापर देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षकांना विनामुल्य करता येणार आहे. तो सहज इन्स्टॉल करता येऊ शकतो.

पवई IIT चा ‘बोधीट्री’ आता सर्वांना उपलब्ध करून दिला असुन या बोधीट्री चा वापर देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षकांना विनामुल्य

‘बोधीट्री’ हा एक ऑनलाईन मल्टीमीडिया प्लॅटफॉर्म आहे. एकप्रकारे आपण वर्गामध्येच शिकवतोय असा फील त्यातून मिळतो. शिक्षकांना डोळ्यासमोर ठेवूनच तो डिझाईन केला गेला आहे. त्यावर पुस्तकेही उपलब्ध आहेत. त्याशिवाय व्हिडियो, सराव पेपर आणि प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱया पृतीही उपलब्ध आहेत.

व्हर्च्युअल लॅब आणि सॉफ्टवेअर लॅब असलेल्या इंजिनियरींग महाविद्यालयांसाठी अधिक फायदेशीर

या प्लॅटफॉर्मचा वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. त्यांची परीक्षाही घेऊ शकतात आणि गुणपत्रिकाही देऊ शकतात.‘बोधीट्री’ हा विशेषकरून व्हर्च्युअल लॅब आणि सॉफ्टवेअर लॅब असलेल्या इंजिनियरींग महाविद्यालयांसाठी अधिक फायदेशीर आहे. सध्या या प्लॅटफॉर्मचा वापर सोलापूर आणि गोव्यातील महाविद्यालयांमध्ये केला जात आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

नवीन फिचर्स आणत Telegram ची Wats app ला टक्कर

Team webnewswala

भारतात पहिल्यांदाच हींग शेतीचा प्रयोग

Team webnewswala

भारतीय लष्कराचं नवं App WhatsApp पेक्षा सुरक्षित

Team webnewswala

Leave a Reply