Team WebNewsWala
धर्म शहर

माघी गणेशोत्सवात ‘POP’ बंदीस स्थगिती

POP वापराबाबत केंद्रीय पर्यावरण खात्याने अभ्यासगट नियुक्त केल्याने त्यांचा अहवाल येईपर्यंत पीओपी वापरावरील बंदीस केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘POP’ बंदीस स्थगिती दिली आहे.

मुंबई : POP वापराबाबत केंद्रीय पर्यावरण खात्याने अभ्यासगट नियुक्त केल्याने त्यांचा अहवाल येईपर्यंत पीओपी वापरावरील बंदीस केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘POP’ बंदीस स्थगिती दिली आहे. त्यामुळे माघी गणेशोत्सवात पीओपीच्या गणेश मूर्तीवर बंदी राहणार नाही.

POP बंदीचा फटका पाच लाख गणेश मूर्तीकार व कारागिरांना बसला आहे.

भाजप आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी जावडेकर यांनी दिल्लीत मंगळवारी पुन्हा भेट घेतली. पीओपीवरील बंदीचा फटका राज्यातील पाच लाख गणेश मूर्तीकार व कारागिरांना बसला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अभ्यास समिती नेमली आहे. माघी गणेशोत्सव जवळ आला आहे. करोना टाळेबंदीमुळे मूर्तीकार व कारागिरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे समितीचा अहवाल येईपर्यंत पीओपी बंदीवरील स्थगिती उठवावी, अशी मागणी शेलार यांनी जावडेकर यांच्याकडे केली. जावडेकर यांनी त्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव प्रशांत गार्गव्ह यांना निर्देश दिल्याची माहिती शेलार यांनी दिली.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भिवंडी आगीचे सत्र सुरूच, यंत्रमाग कारखान्याला आग

Web News Wala

लोटे एमआयडीसी मध्ये आगीचे सत्र सुरूच M R Farma कंपनीत आग

Web News Wala

३८ हजार रुग्णांनी घेतला ई – संजीवनी ऑनलाईन ओपीडी चा लाभ

Web News Wala

Leave a Reply