Team WebNewsWala
आरोग्य शहर

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता

ठाकरे सरकार कडून पुन्हा एकदा सोमवार पासून अनलॉक करण्यात आले आहे. त्यानुसार नवी नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता 

Webnewswala Online Team – संपूर्ण देशांमध्ये कोरोनाची साथ पसरली आहे. अशातच राज्यातील कोरोनाबाधित बाधित रुग्णांची संख्या हळूहळू घटत असली तरी चिंता मात्र कायम आहे. कारण तज्ञांनी कोरोनाची यापुढेही तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे भाकित केले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कोरोनाची राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबीयांची काळजी घ्या, असे आवाहन केले आहे. आज मुंबईत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या ऑनलाइन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

औषधांचा अतिवापर देखील घातक

यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्‍यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे कुटुंबीयांची काळजी घ्या आणि पावसाळा येत आहे त्यामुळे या काळात सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं आहे. राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोना वरील उपचारांबाबत आता औषधांचा अतिवापर देखील घातक ठरत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे औषधांचा अनाठायी वापर आपण टाळायला हवा तसेच. सतर्क राहण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. कोरोनाचा आजार अंगावर अजिबात काढू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, कोरोना हा आधार अजिबात अंगावर काढण्यासारखा आजार नाही. तो अंगावर काढू नका तो आजार इतर आजारांसारखा नाही. वेळीच उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतही औषध घेऊ नका. राज्यात कोरोना नंतर बुरशीजन्य म्युकोर मायकॉसिस रोगाचा प्रसार वाढत आहे. यामागे औषधांचा अतिवापर हे महत्त्वाचं कारण असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर असं व्हायला नको बुरशीजन्य आजारांवर देखील आता उपचार पद्धती निश्चित व्हायला हवी असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Web Title – राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता ( Possibility of a third wave of corona in the state )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात ऑनलाइनच

Web News Wala

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ना भारतरत्न द्या, शिवसैनिकानं लिहिलं रक्तानं पत्र

Team webnewswala

अतिवृष्टीमुळे मुळे कोसळली विजयदुर्ग किल्ल्याची भिंत

Team webnewswala

Leave a Reply