Team WebNewsWala
Other आंतरराष्ट्रीय आरोग्य

प्लास्टिक Face Shild Coronavirus पासून बचावासाठी बिनकामाच्या

विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्रास वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक Face Shild बिनकामाच्या असल्याचं नवीन संशोधनातून समोर आलं आहे.
टोकियो : कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) बचावासाठी जगभरात विविध उपाय केले जात आहेत. जगभरात कोरोनाच्या लशीवर (Corona vaccine) संशोधन सुरू आहे. पण लस येईपर्यंत सर्वात प्रभावी उपाय म्हणून सॅनिटायझर, मास्क, प्लास्टिक Face Shild चा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचा अवलंब करण्यात येत आहे. पण विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्रास वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक Face Shild बिनकामाच्या असल्याचं नवीन संशोधनातून समोर आलं आहे.

सॅनिटायझरनंतर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक Face Shild चा वापर

सॅनिटायझरनंतर मोठ्या प्रमाणात नागरिक जगभरात प्लॅस्टिक शिल्डचा वापर करताना दिसून येत आहेत. पण ही प्लॅस्टिक शिल्ड सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. जपानमध्ये यासंबंधित संशोधन करण्यात आलं .रिकेन सेंटर फॉर कम्प्युटर सायन्समध्ये प्लास्टिक Face Shild विषाणूला रोखण्यात किती उपयुक्त आहे याविषयी अभ्यास करण्यात आला. या शास्त्रज्ञांचे टीम लीडर असणारे मोटो त्सुबोकोरा म्हणाले, यामुळे आता कोरोनापासून बचावासाठी नक्की काय प्रभावी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

‘फेस शिल्डकडे मास्कला पर्याय म्हणून पाहू नये. फेस मास्कच्या तुलनेत प्लॅस्टिक शिल्ड कमी सुरक्षित आहे. -मोटो त्सुबोकोरा

प्लॅस्टिक शिल्ड कोरोनापासून बचाव करू शकत नसल्याचा निष्कर्ष

जपानमधील या संशोधन केंद्रात करण्यात आलेल्या चाचणीत जपानी सुपर कम्प्युटरनुसार,प्लॅस्टिक शिल्ड एरोसोल्सला पकडण्यासाठी प्रभावी साधन सिद्ध झालेलं नाही. त्याचबरोबर हे प्लॅस्टिक शिल्ड पूर्णपणे कोरोनापासून आपलं संरक्षण करत नसल्याचंदेखील सिद्ध झालं आहे. जपानमधील रिकेन सायंटिफिक रिसर्च सेंटर कंपनीचा फुगाकू सुपर कम्प्युटर अतिशय वेगवान आहे. त्याच्या मदतीनं हे संशोधन करण्यात आलं असून, यामध्ये हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
जपानचा हा सुपर कॉम्प्युटर एका सेकंदात 415 क्वाड्रिलियनची गणना करू शकतो. श्वासोच्छवासातून पाण्याचे थेंब कसे पसरले जातात याचादेखील याने शोध लावला आहे. प्लॅस्टिक शिल्डच्या या प्रयोगात या कम्प्युटर फुगाकूने प्लॅस्टिक फेस शिल्डचं स्टिमुलेशन केलं आहे. ज्यात 100 टक्के एयरबॉर्न ड्रॉपलेट्स 5 मायक्रोमीटरहून लहान आढळले. त्यामुळं हे प्लॅस्टिक शिल्ड कोरोनापासून बचाव करू शकत नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

प्लॅस्टिक शिल्ड वापरण्यासाठी कोणतीही नियमावली नाही

दरम्यान, विविध देशांमध्ये देखील हे प्लॅस्टिक शिल्ड वापरण्यासाठी कोणतीही नियमावली नाही. मात्र तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही हे वापरू शकता. मात्र यामध्ये तुमचा चेहरा आणि नाक पूर्णपणे झाकलं जायला हवं, असं स्कॉटलंडच्या सरकारने म्हटलं आहे. त्याचबरोबर इंग्लंडमध्येही यासाठी कोणतीही नियमावली नाही. मात्र आता जपानमधील या संशोधनाच्या निष्कर्षानंतर नागरिक काय करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

IPL 2021 सप्टेंबरमध्ये होणार दुबईत

Web News Wala

आहारात मिठाच्या प्रमाणाबद्दल WHO च्या नव्या गाईडलाईन

Web News Wala

नदीत टाकलं जाळं, ओढल्यानंतर दिसली मगर

Team webnewswala

Leave a Reply