Team WebNewsWala
पर्यावरण शहर

मुंबईत इथून पुढे देशी झाडांचीलागवड

मुंबईत इथून पुढे देशी झाडांची लागवड केली जाणार आहे. मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी.

मुंबईत इथून पुढे देशी झाडांची लागवड

मुंबई – मुंबईत इथून पुढे देशी झाडांची लागवड केली जाणार आहे. मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

देशी झाडांची लागवड ऐवजी इतर प्रजातींची झाडे लावल्यास ती मुंबईच्या मातीमध्ये घट्टपणे मूळ धरत नाहीत. त्यामुळे ही झाडे उन्मळून पडण्याचा धोका असतो. त्यामुळे मुंबईतील मातीची वैशिष्टय़े लक्षात घेऊन ४१ स्थानिक प्रजातींची झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार यापुढे मुंबईत पालिकेतर्फे तामण, बहावा, करंज, चंपा, बकुळ, कडुनिंब यांसारखी झाडे लावण्यात येणार आहेत.

नागरिकांनी स्थानिक प्रजातींचीच झाडे लावावीत, असं आवाहन 

नागरिकांनी त्यांच्या सोसायटीच्या आवारात स्थानिक प्रजातींचीच झाडे लावावीत, असंही आवाहन आयुक्त चहल यांनी केलं आहे.

मुंबईत याआधी पर्जन्यवृक्ष लावण्यात आले होते. मात्र, या झाडांवर विशिष्ट प्रकारचे किडे आढळून आले. या किड्यांचा प्रसार वेगाने झाल्यामुळे मुंबईतील पर्जन्यवृक्ष पोखरून उन्मळून पडू लागले होते. त्यानंतर मुंबईत देशी झाडे लावण्याचा विचार व्यक्त होऊ लागला होता.

ही झाडे लावण्यात येणार

वड, पिंपळ, उंबर, कांचन, कदंब, गुंज, पळस, निम, महोगनी, मोह, बहावा, साग, अर्जुन, ऐन, किंजळ, सीता अशोक, उंडल, नागकेशर, चंपा, शिवन, शिरीष, करंज, बकुळ, बेल, तामण, हिरडा, बेहडा, नारळ, आवळा, खैर, तेतू, आंबा, पुत्रंजीवा, जंगली बदाम, बिब्बा, पारिजातक, रिठा, चंदन, कुंभ, फणस, चाफा ही झाडे लावण्यात येणार.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

अमृता फडणवीसांवर रेणुका शहाणेंची खरमरीत टीका

Team webnewswala

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरणावरील पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन

Team webnewswala

मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत घरांचे स्वप्न साकार

Web News Wala

Leave a Reply