Team WebNewsWala
Other क्राईम पर्यावरण

मृत अजगराचे फोटो व्हायरल सात जणांविरूद्ध गुन्हा

Photos of a dead dragon went viral

नांदेड रोजी पाटनूर ग्रामपंचायत या व्हॉट्सअप ग्रुपवर अजगरास मारून त्यास ओढीत नेत असल्याचा फोटो व्हायरल केला होता. मृत अजगराचे फोटो व्हायरल करणे पडले महागात या व्हायरल फोटोची वनविभागाने दखल घेतली असून फोटोमधील ७ जणांची ओळख पटवली आहे.अजगराला मारून त्याचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल केलेल्या ७ जणांविरूद्ध नांदेड वनविभागाने गुन्हा दाखल केला असून या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

वन्यजीव संरक्षक अधिनियम 1972 गुन्हा दाखल

परमेश्वर दत्ता कोकाटे, सटवाजी डुमणे, राजू गायकवाड, पंडित येळणे, अप्पाराव कोकाटे, रामा पतंगे, नागोराव मिरासे अशी या 7 जणांची नावे आहेत. या सर्वांनी अजर मारल्याची कबुली दिली आहे. त्यांना मुदखेड येथील न्यायालयात हजर केले असून त्यांच्याविरूद्ध वन्यजीव संरक्षक अधिनियम 1972 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना तीन वर्षांपर्यंत तुरूंगवास व 25 हजारांपर्यंतचा दंड लागू शकतो, असे वनविभागाने म्हटले आहे.

उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक वनसंरक्षक डी.एस.पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे, सचिन रामपुरे, वनपाल पी.ए.धोंडगे, बी.ए.हाकदळे, मानद वन्यजीवरक्षक अतिंद्र कट्टी, वनरक्षक शिंदे, घुगे, काकडे, गव्हाणे, दासरवाड, वसीम, जाधव आदिंनी या कारवाईसाठी परिश्रम घेतले.

आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | इंस्टाग्राम | youtube | ट्विटर | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

5.62 लाख भारतीयांचा Facebook Deta चोरी : Cambridge Analytica विरोधात गुन्हा

Web News Wala

नवपदवीधरांना MTDC त काम करण्याची संधी

Team webnewswala

कर्नाटक सरकारला शिवरायांचे वावडे हटवला महाराजांचा पुतळा

Team webnewswala

1 comment

Leave a Reply