Team WebNewsWala
क्राईम मनोरंजन शहर

नागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक

आता एकता कपूरच्या नागिन (Naagin) या मालिकेतील अभिनेता पर्ल व्ही पुरी (Pearl V Puri) याला मुंबई पोलिसांनी चक्क बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे.

नागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक

Webnewswala Online Team – टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर खळबळ माजली आहे. अलिकडेच ये रिश्ता क्या कहलाता है (Yeh Rishta Kya Kehlata Hai) फेम करण मेहराला (Karan Mehra) घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एकता कपूरच्या नागिन (Naagin) या मालिकेतील अभिनेता पर्ल व्ही पुरी (Pearl V Puri) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Pearl V Puri arrested in rep case) त्याला मुंबई पोलिसांनी चक्क बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे.

बॉलिवूड बबलनं दिलेल्या वृत्तानुसार पर्ल विरोधात एका महिलेने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. 4 जून रोजी या माहिलेच्या कुटुंबीयांनी पर्ल विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर काही तासांतच त्याला अटक करण्यात आली. या महिलेचं नाव काय? किंवा ती नेमकी आहे तरी कोण? याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. व लवकरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

पर्ल व्ही पुरी हा छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यानं आतापर्यंत बेपनाह प्यार, ब्रह्मराक्षस 2, नागिन 3, ‘नागार्जुन एक योद्धा’ यांसारख्या अनेक सुपरहिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही काळात तो नागिन या मालिकेमुळं प्रचंड चर्चेत होता. सोशल मीडियावर देखील त्याची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या अटकेमुळं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Web Title – नागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक ( Pearl V Puri arrested in rep case )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

कोपरी पुल कामासाठी मध्य रेल्वेवर रात्रीचे विशेष ब्लॉक

Web News Wala

मुंबईत आज बरे होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा 9 पटीने अधिक

Web News Wala

‘मामलेदार मिसळ’ चे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांचं निधन

Team webnewswala

Leave a Reply