Team WebNewsWala
Other अर्थकारण नोकरी राष्ट्रीय

18 कोटी लोकांचे PAN कार्ड होऊ शकते रद्द

18 कोटी लोकांचे PAN कार्ड होऊ शकते रद्द सरकारने बुधवारी अशी माहिती दिली की, आधार कार्डशी (Aadhar Card) आतापर्यंत 32.71 कोटी पॅन कार्ड (Permanent Account Number PAN) जोडले गेले आहेत.

सरकारने बुधवारी अशी माहिती दिली की, आधार कार्डशी (Aadhar Card) आतापर्यंत 32.71 कोटी पॅन कार्ड (Permanent Account Number PAN) जोडले गेले आहेत.

नवी दिल्ली : बँकिग किंवा इतर आर्थिक कामे, सरकारी कामे, विविध योजनांचा फायदा घेण्यासाठी, शैक्षणिक किंवा नोकरी विषयक कामांसाठी आधार आणि पॅन हे दोन महत्त्वाचे दस्तावेज तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

एवढेच नव्हे तर आधार-पॅन लिंक असणे देखील गरजेचे आहे. सरकारने बुधवारी अशी माहिती दिली की, आधार कार्डशी (Aadhar Card) आतापर्यंत 32.71 कोटी पॅन कार्ड (Permanent Account Number PAN) जोडले गेले आहेत. My Gov India ने ट्विटरवर असे लिहिले आहे की, आधारशी 32.71 कोटींपेक्षा जास्त पॅन जोडले गेले आहेत.

सरकारने आधीच पॅन आणि आधार लिंक करण्याची तारीख 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे. या ट्विटनुसार 29 जून पर्यंत 50.95 कोटी पॅनकार्ड अलॉट करण्यात आले आहेत.

18 कोटी लोकांचे PAN कार्ड होऊ शकते रद्द

तुमच्या अनेक महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी किंवा इतर काही कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. मात्र जर ते आधारशी लिंक करण्यात आले नसेल, तर त्याचा आर्थिक फटका देखील सहन करावा लागेल.

18 कोटी लोकांचे PAN कार्ड होऊ शकते रद्द सरकारने बुधवारी अशी माहिती दिली की, आधार कार्डशी (Aadhar Card) आतापर्यंत 32.71 कोटी पॅन कार्ड (Permanent Account Number PAN) जोडले गेले आहेत.

अन्यथा निष्क्रिय होईल PAN

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या अवधीमध्ये आधार-पॅन लिंक केले नाही (Deadline for Linking PAN with Aadhar Card) तर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल.  केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की देशातील सुमारे 18 कोटी पॅनकार्ड आधारशी जोडलेले नाहीत. 29 जूनपर्यंत 50.95 कोटी पॅनचे वाटप करण्यात आले आहे. म्हणजे जवळपास 18 कोटी पॅनकार्ड आधारशी जोडलेले नाहीत. जर तुम्हालाही या यादीमध्ये समाविष्ट केले असेल तर तुमच्याकडे अवघ्या 7 महिन्यांचा कालावधी आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठीसुद्धा आधार-पॅन लिंकिंग बंधनकारक आहे. त्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा थांबवायचा असेल तर आधार-पॅन लिंक करणं आवश्यक आहे. आयकर विभागाकडून इशारा देण्यात आला होता की, पॅन-आधार लिंक न केल्यास पॅनकार्ड रद्द करण्यात येईल. मात्र आता ही तारीख आता वाढवण्यात आल्याने ज्यांनी हे काम पूर्ण केले नाही आहे, त्यांना दिलासा मिळाला आहे.

18 कोटी लोकांचे PAN कार्ड होऊ शकते रद्द सरकारने बुधवारी अशी माहिती दिली की, आधार कार्डशी (Aadhar Card) आतापर्यंत 32.71 कोटी पॅन कार्ड (Permanent Account Number PAN) जोडले गेले आहेत.

( हे वाचा – लवकरच बदलु शकतात ग्रॅच्युईटीचे नियम )

मात्र डेडलाइन आधी तुम्ही हे दोन दस्तावेज लिंक केले नाही तर तुम्हाला दंड देखील बसू शकतो. आयकक कायदा 272B अंतर्गत तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड देखील बसू शकतो. आयकर कायद्या अंतर्गत काही गैरसोयींना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. उदाहरणार्थ तुम्हाला 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यातून काढायची आहे किंवा भरायची आहे, तर त्याकरता पॅन कार्ड आवश्यक आहे. आधारशी लिंक न केल्यामुळे तुमचे पॅन निष्क्रिय राहील. परिणामी हा व्यवहार तुम्हाला पूर्ण करता येणार नाही.

कसे कराल आधार-पॅन लिंकिंग ?
  • आधार पॅन लिंकिंगसाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा.
  • तिथं तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE या पर्यायावर क्लिक करून माहिती द्या.

  • तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल. लिंकिंग झालं नसेल तर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव आणि कॅप्चा दिल्यानंतर ‘लिंक आधार’ पर्यायावर क्लिक करा.तुमचे आधार पॅन कार्ड लिंकिंग होऊन जाईल
( हे वाचा- नोकरीची सुवर्णसंधी SBI मध्ये 4 हजार पदांसाठी भरती )
  • ‘View Link Aadhaar Status’  वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालं आहे की नाही ते समजेल
  • याची माहिती तुम्हाला 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवूनही मिळवता येते.
  • UIDPAN<space><आधार क्रमांक><space><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवाला लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

लवकरच गुगलचे हे लोकप्रिय अ‍ॅप होणार बंद

Team webnewswala

कोविड 19 जनजागृती अभियान अंतर्गत ऑनलाइन विचारमंथन

Team webnewswala

१० हजारांपेक्षा अधिक रोकड काढताना लागणार OTP

Team webnewswala

Leave a Reply