Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान

पाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी

बंदी घातलेल्या चिनी अ‍ॅप्स ची भारतात नव्या ‘अवतारात’ एन्ट्रीचा प्रयत्न करत आहेत. रिपोर्ट्सनुसार त्यात चिनी अ‍ॅप्सचे रिब्रँडेड व्हर्जनही आहेत.

पाकिस्तानच्या सरकारने आपला मित्र चीनला मोठा झटका दिला आहे. भारतानंतर आता पाकिस्तानने देखील चीनला मोठा झटका दिला आहे  पाकिस्तानने देखील चीनच्या बिगो अ‍ॅपवर बंदी घातली आहे. सोबतच टीक-टॉकला अखेरचा इशारा दिला आहे.

पाकिस्तानमध्ये अश्लील आणि अनैतिक साम्रगी दाखवत असल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. या आधी पाकिस्तानने गेमिंग अ‍ॅप पबजीवर बंदी घातली होती.

CHINA APP
जुलै महिन्यात पब्जी गेमवरही बंदी

जुलै महिन्याच्या सुरूवातीला पीटीएने पब्जी गेमवरही बंदी घातली होती. त्यावेळी, ‘हा गेम एखाद्या व्यसनाप्रमाणे असून यामुळे मुलांच्या शारिरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर नकारात्मक परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये पब्जीमुळे तरुणांनी आत्महत्या केल्याचं वृत्तही आलं होतं. त्यानंतर गेमवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला’ असं पीटीएकडून सांगण्यात आलं होतं.

मागील आठवड्यात लाहौरच्या उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करत टीक-टॉकवर त्वरित बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.

pak vs china

याचिकाकर्त्यांनुसार, हे अ‍ॅप आधुनिक काळात वाईट आहे. टीक-टॉक पोर्नोग्राफीचा मोठा स्त्रोत आहे. पाकिस्तान सरकारने म्हटले आहे की, टीक-टॉक आणि बिगोबाबत समाजातील विविध घटकांकडून तक्रारी आल्या होत्या.

पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन ऑथोरिटीने (पीटीए) काही दिवसांपूर्वी ऑनलाइन बॅटल गेम ‘प्लेयर अननोन बॅटलग्राउंड’ (Player Unknown’s Battle grounds) अर्थात पब्जीवर बंदी घातली होती.

अश्लील’ आणि ‘अनैतिक’ सामग्रीमुळे अंतिम इशारा

त्यानंतर आता लाइव्ह स्ट्रीमिंग अ‍ॅप्लिकेशन ‘बिगो लाइव्ह’वरही (Bigo Live App) बंदी घातली आहे. तसेच, पीटीएने ‘अश्लील’ आणि ‘अनैतिक’ सामग्रीमुळे शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप्लीकेशन टिकटॉकलाही अंतिम इशारा दिला आहे.

“तक्रारी मिळाल्यानंतर या कंपन्यांना नोटीस देण्यात आली होती, पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यामुळे बिगो लाइव्हला तातडीने ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच टिकटॉकला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अश्लील आणि अनैतिक सामग्रीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्र विकसित करण्याचा इशारा देण्यात आला आहे”, अशी माहिती पीटीएकडून देण्यात आली.

पाकिस्तानी सरकारने म्हटले की, दोन्ही अ‍ॅपकडून आलेले उत्तर समाधानकारक नाही. यानंतर सरकारने बीगोवर बंदी घालत, टीक-टॉकला शेवटचा इशारा दिला आहे.

आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

चंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ अजून सुस्थितीत? फोटोंवरुन समोर आली नवीन माहिती

Team webnewswala

कोरोनामुळे जगभरात बेरोजगारीचे संकट UN चा इशारा

Web News Wala

Cricket ब्लॉकबस्टर महिना, 24 दिवसांत 18 आंतरराष्ट्रीय सामने

Web News Wala

12 comments

Leave a Reply