Team WebNewsWala
तंत्रज्ञान

WhatsApp ला पर्याय Signal App चा

WhatsApp मेसेजिंग अँपने त्यांची नवी प्रायव्हसी पॉलिसी (खासगीपणाचे धोरण) जाहीर केली. या पॉलिसीमुळे व्हॉट्सअँप वापरावे की वापरू नये असा प्रश्न

मुंबईः WhatsApp या लोकप्रिय मेसेजिंग अँपने त्यांची नवी प्रायव्हसी पॉलिसी (खासगीपणाचे धोरण) जाहीर केली आहे. या पॉलिसीमुळे भविष्यात व्हॉट्सअँप वापरावे की वापरू नये असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. या समस्येवर उत्तर म्हणजे Signal App हे आहे. हे अँप जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती अँलन मस्क वापरतात. त्यांनी स्वतः ही माहिती जाहीर केली आहे.

Signal App वापरण्यासाठी अधिक सुरक्षित आणि सोपे

वापरण्यासाठी व्हॉट्सअँप सारखेच असलेले पण अधिक सुरक्षित आणि सोपे असे सिग्नल हे मेसेजिंग अँप आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हॉट्सअँप सारखी युझरची चिंता वाढवणारी प्रायव्हसी पॉलिसी (खासगीपणाचे धोरण) सिग्नल अँप वापरत नाही. डेटा सुरक्षित राहील असी ग्वाही सिग्नल अँपकडून दिली जाते. याच कारणामुळे मागील काही दिवसांपासून सिग्नल या अँपची लोकप्रियता वाढली आहे.

WhatsApp कडे असलेल्या युझर डेटाचा वापर फेसबुक करणार

फेसबुक, मेसेंजर, व्हॉट्सअँप आणि इन्स्टाग्राम ही फेसबुक कंपनीची डिजिटल उत्पादने

याच कारणामुळे व्हॉट्सअॅपच्या डेटाचा व्यावसायिक वापर करण्याची तयारी फेसबुक करत आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे फेसबुकचे काम सोपे होणार आहे. मात्र ज्यांना स्वतःची खासगी माहिती मोठ्या प्रमाणावर शेअर होऊ नये असे वाटते त्यांनी अद्याप व्हॉट्सअँपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीला एक युझर म्हणून संमती दिलेली नाही. हे युझर पर्यायाच्या शोधात आहेत. या युझरसाठी सिग्नल हे मेसेजिंग अँप एक सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे.

Signal App हे एक ओपन सोर्स अँप

सिग्नल हे एक ओपन सोर्स अँपआहे. या अँपचा सोर्स कोड सार्वजनिक करण्यात आला आहे. या कोडच्या मदतीने तज्ज्ञ व्यक्ती अॅपच्या सुरक्षेची आणि डेटा प्रायव्हसीची (माहितीच्या सुरक्षेची) तांत्रिक खात्री करुन घेऊ शकतात. सिग्नल अँपवरील कोणत्याही चॅटचा कोणत्याही अँपच्या मदतीने स्क्रीनशॉट घेता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे Signal App युझरची खासगी माहिती संकलित करत नाही. याउलट व्हॉट्सअँप युझरचे सर्व संपर्क क्रमांक (कॉन्टॅक्ट लिस्ट), फोटो आणि व्हिडीओंची गॅलरी, म्युझिक फोल्डर यांना अँक्सेस करुन ही माहिती स्वतःकडे कायमस्वरुपी तांत्रिक स्वरुपात नोंदवून ठेवते.

सिग्नल अँप युझरचे सर्व संपर्क क्रमांक (कॉन्टॅक्ट लिस्ट), फोटो आणि व्हिडीओंची गॅलरी, म्युझिक फोल्डर यांना अँक्सेस करते पण ती माहिती स्वतःकडे नोंदवून ठेवत नाही. यामुळे युझरचा खासगी डेटा शेअर होत नाही. व्हॉट्सअँपच्या तुलनेत सिग्नल अँपमध्ये खूप आधीपासूनच अदृश्य होणाऱ्या अर्थात डिसअपिअरिंग मेसेजचा पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायाद्वारे ठराविक मुदतीनंतर संदेश आपोआप दिसेनासा होतो. यामुळे आधीच्या संवादाचे पुरावे मागे उरत नाही.

स्मार्टफोनवर कोणताही डेटा सुरक्षित नाही

स्मार्टफोनवर कोणतेही अँप वापरले तर संबंधित अँपच्या सर्व्हरला मोबाइलमधील युझरचे सर्व संपर्क क्रमांक (कॉन्टॅक्ट लिस्ट), फोटो आणि व्हिडीओंची गॅलरी, म्युझिक फोल्डर, महत्त्वाच्या डॉक्युमेंटचे फोल्डर या गोष्टींना आवश्यकतेनुसार अँपक्सेस करावा लागतो. याच कारणामुळे अँप कंपनीने प्रायव्हसी पॉलिसी बदलली अथवा त्यांचे सर्व्हर हॅक झाले तर खासगी डेटा शेअर होण्याचा धोका असतो. याआधी गूगल आणि फेसबुकच्या मर्यादीत डेटाच्या हॅकिंगच्या घटना घडल्या आहेत. यामुळे इंटरनेट विश्वाचा भाग असलेला अमूक एक सर्व्हर सुरक्षित आहे असे म्हणणे कठीण आहे. अद्याप या सर्व्हरचे हॅकिंग झालेले नाही एवढेच म्हणता येऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे युझर अनेक अँप वापरतात त्यामुळे एखाद्या अँपवर तुमचा अमूक एखादा डेटा शेअर होत नसला तरी दुसऱ्या अँपवर हा डेटा शेअर होतच असतो.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.[penci_related_posts taxonomies=”undefined” title=”हे ही वाचाbackground=”” border=”” thumbright=”yes” number=”12″ style=”grid” align=”none” displayby=”cat” orderby=”random”

Related posts

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Storm R3 ची बुकिंग सुरू

Web News Wala

मोबाईल नेटवर्क नसण्याच्या समस्येवर रामबाण उपाय

Web News Wala

‘HotShots’ वेबसिरीज ॲपवर बंदी

Team webnewswala

Leave a Reply