Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान व्यापार

दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग

Realme c 11

लडाख लडाखमधील गलवाण खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर देशभरात चीन वस्तुंवर बहिष्कार घालण्याची मोहिम सुरु झाली होती. पण याच दरम्यान भारतात काल पहिल्यांदाच रिअलमी कंपनीने Realme C11 या लेटेस्ट बजेट स्मार्टफोनसाठी फ्लॅश सेलचे आयोजन केले होते.

भारतीय ग्राहकांचा या सेलमध्ये Realme C11 ला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे. दुपारी 12 वाजता ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट आणि रिअलमी इंडियाच्या वेबसाइटवर सेल सुरू झाल्यानंतर 1.5 लाखांहून जास्त Realme C11 फोनची अवघ्या दोन मिनिटांतच विक्री झाल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. आहे. याबाबतची माहिती रिअलमी कंपनीने ट्विटरद्वारे दिली आहे.

गेल्या आठवड्यात भारतात कंपनीने Realme C11 हा नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचबरोबर गेल्या महिन्यात मलेशियामध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर आणि 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

AI फीचरही शानदार फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्यामध्ये दिले आहे. Realme C11 मध्ये 6.5 इंच एचडी+ (720×1600 पिक्सल) मिनीड्रॉप डिस्प्ले आहे. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ असून 2.3 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर देण्यात आला आहे. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनला मेमरी कार्डचाही सपोर्ट आहे.

Realme c 11

अँड्रॉइड 10 बेस्ड रिअलमी यूआयवर आधारित हा फोन ड्युअल-सिम कार्डला सपोर्ट करतो. या फोनच्या मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप असून 13 मेगापिक्सलचा प्रायमरी तर, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे.

याशिवाय सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. कॅमेऱ्यात AI ब्यूटी, फिल्टर मोड, एचडीआर, पोर्ट्रेट मोड आणि टाइमलॅप्स यांसारखे अनेक फीचर्स आहेत. तसेच, फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4जी एलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, माइक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक यांसारखे पर्याय आहेत.

29 जुलै रोजी हा फोन पुन्हा एकदा फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. 7,499 रुपये एवढी रिअलमी सी11 या नवीन फोनची किंमत ठेवण्यात आली आहे. हा फोन रिच ग्रीन व रिच ग्रे अशा दोन कलरमध्ये उपलब्ध असेल.

हे ही वाचा
अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक ?
पाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

गंगेत सापडला Suckermouth catfish तज्ज्ञांकडून चिंता

Team webnewswala

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उभी करणार फिल्मसिटी

Team webnewswala

हार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती

Team webnewswala

13 comments

Leave a Reply