Team WebNewsWala
Other नोकरी शहर

नवपदवीधरांना MTDC त काम करण्याची संधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्राला नव्याने उभारी देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (इंटर्नशिप) कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील नवपदवीधरांना त्यामुळे MTDC त काम करण्याची संधी मिळणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्राला नव्याने उभारी देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ( MTDC ) इंटर्नशिप कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील नवपदवीधरांना MTDC त काम करण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमात नवपदवीधरांना समाजमाध्यमे, मनुष्यबळ विकास, माहिती व तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच एमटीडीसीच्या अखत्यारीत असलेल्या निसर्गरम्य रिसॉर्ट, अ‍ॅडव्हेंचर पार्क, डायव्हिंग संस्था इत्यादींच्या विकासासाठी कल्पना मांडता येतील व विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविता येईल.

या कार्यक्रमात राज्यातील नवपदवीधरांना MTDC त काम करण्याची संधी आणि महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. त्याचप्रमाणे विभागाचे मंत्री तसेच महामंडळाचे अधिकारी यांच्यासोबत काम करण्याची संधी उपलब्ध होईल.

राज्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवीत आहोत. यात युवकांच्या नवकल्पनांचीही आवश्यकता आहे. MTDC सोबत महाराष्ट्राचे पर्यटन पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे पर्यटनवैभव संपूर्ण विश्वाला दाखवण्यासाठी या कार्यक्रमात तरुणांनी सहभागी व्हावे. प्रवास व पर्यटनाची आवड असेल तर एमटीडीसीच्या या नवीन मोहिमेचा भाग व्हा. कार्यकुशल उमेदवारांच्या संकल्पनांना यात निश्चित चालना दिली जाईल
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
मानधन 10 हजार रुपये आणि अनुभव प्रमाणपत्र 

दहा हजार रुपये मानधन व एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या सहीने अनुभव प्रमाणपत्र दिले जाईल. समाज माध्यमांसाठीचे काम करणाऱ्या उमेदवारांचे मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभुत्व असावे. आंतरवासिता कार्यक्रमाचा कालावधी ६ महिन्यांचा असेल. जे उमेदवार आपले काम कुशलपणे करतील त्यांना ५ महिन्यांचा वाढीव कालावधी दिला जाईल. २५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

महाराष्ट्राचा राम साकारणार अयोध्येतील रामाची मुर्ती

Team webnewswala

हिंदी बोलताच, A R Rehman ने उडवली अँकरची खिल्ली

Web News Wala

मुंबईकरानो मास्क घालूनच घराबाहेर पडा, नाहीतर करा साफसफाई

Team webnewswala

Leave a Reply