Other शहर समाजकारण

कोविड 19 जनजागृती अभियान अंतर्गत ऑनलाइन विचारमंथन

Mumuni School of Thoughts अकादमीच्या वतीने सुरु असलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत रविवार दि.१३ सप्टेंबर, २०२० रोजी, झूम अ‍ॅपवर संध्याकाळी ५:०० वाजता प्रा. प्रतिभा कांबळे यांचे 'टाळेबंदी नंतरची अर्थव्यवस्था: स्वरूप आव्हाने व क्षमता' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

सामाजिक स्वास्थ्य जपताना भौतिक विलगीकरणाचा पवित्रा जपत ‘सामाजिक वैचारिक प्रेरणा प्रज्वलित करतण्यासाठी‘, कोरोना  विषाणूच्या  संसर्गाला  आळा घालण्यासाठी सध्या पूर्ण देश लॉकडाऊन असताना  सरकारी नियमांचे पालन करीत कोविड 19 सामाजिक जन जागृती अभियान अंतर्गत Mumuni School of Thoughts अकादमीच्या विद्यमाने ऑनलाइन विचारमंथन करणारे झूम ॲपच्या माध्यमातून “बहुजन समाजातील नेतृत्वा समोरील आव्हाने”  या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले.
सदर ऑनलाइन व्याख्यानात रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा. युवराज धसवाडीकर सर यांनी बहुजन ह्या संकल्पनेचा आशय व त्याची व्याप्ती व रुढ अर्थाने तीचे खरे वेगळेपण विशद केले,

बहुजन संकल्पनेची नाळ बौद्ध, चार्वाक, संत कबीर, संत तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज ते वारकरी सांप्रदाय या मातीशी घट्ट संबंध जोडून विवेचनाची सुरूवात केली.

बहुजन नेतृत्वाला दलित, चांभार जाती पुरत मर्यादित करण्याचे प्रस्थापित राजकारणाचे षडयंञ ओळखण्याची गरज, बहुजन नेतृत्व हे जात धर्म वर्ग विरहित असून ती शोषण, अन्याय, अत्याचाराला बळी पडलेल्यांसाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय असमानतेच्या चरकात भरडले गेलेल्या समुदायाची आपल्या शोषणमुक्तीसाठी हक्कासाठी स्वाभिमानासाठी सत्तेत वाटा हवा ध्येयाने वेगाने पुढे येणारे नेतृत्व आहे.

समविचारी गटांना एकञ घेऊन त्यातील अंतरविरोध दुर करून सातत्य व चिकाटीने राजकीय कृति कार्यक्रमात रूपांतर करण्याचे आव्हान बहुजन नेतृत्वापुढे आहे.
हिंदुत्व, भांडवली, सरंजाम दडपशाहीपुढं हादरलेल्या जनसमुहांना त्यांच्या राजकीय हक्कांसाठी एक सुञात बांधण्याचे अवघड काम त्यांची सांस्कृतिक वेगळी ओळख जपून एकञ करणे क्रमप्राप्त आहे व सर्व राजकीय शक्यतांचे कुशलतेने वापर करुन राजकीय महत्वकांक्षा उंचावून राजकीय सत्तेकडे वाटचालीचे अवघड काम बहुजन समाज आणि नेतृत्वापुढे आव्हानात्मक आहे.

संविधानाला छेद देणाऱ्या घटनांचा वाढता धोका, वाढता असंतोष लक्षात घेऊन संविधानाला अभिप्रेत असलेल्या कल्याणकारी राज्याच्या आग्रह धरण्याची गरज व निष्ठूर प्रस्थापित राजकीय सत्तेपुढे जातीवर्ग अंताचा लढा नव्याने लढण्याची तयारी करावी लागेल अशी प्रबोधनात्मक मांडाणी केली.
या कार्यक्रमाचे आयोजन , प्रशांत भालेराव, प्रा. प्रज्ञाकिरण वाघमारे,  प्रा.डॉ.विद्यानंद खंडागळे, तुषार शेलार, प्रा.संदीप कदम, किरण गांगुर्डे, प्रशांत तायडे,  प्रा. प्रफुल भोसले, मंगेश सावंत, प्रा. किशोर मोरे यांनी केले. तर प्रफुल सावंत सरांनी सुञसंचलन व संदिप भांगरे सरांनी आभार व्यक्त केले.

हे ही वाचा 
MumUni School of Thoughts – समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या, शिवसैनिकानं थेट उद्धव ठाकरेंना लिहिलं रक्तानं पत्र 
डोंगरी-माझगाव ला जोडणाऱ्या हॅकॉक पुलाच काम अंतिम टप्यात
आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पुणे मेट्रो ला ‘मनसे’ विरोध

Web News Wala

दिवाळीत सोन्याचे दर स्वस्त होणार की महाग ?

Team webnewswala

‘मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण हवे

Web News Wala

3 comments

Leave a Reply