Team WebNewsWala
नोकरी शहर

पोलिसांसाठी एक लाख घरे, गृहमंत्री अनिल देशमुख

राज्य पोलीस दलासाठी एक लाख घरे बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली आहे.

नागपूर : पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी घरे आहेत. पोलीस दलाची घरांची वाढती मागणी लक्षात घेता राज्य पोलीस दलासाठी एक लाख घरे (One lakh Homes for Maharashtra Police) बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली आहे.

नागपुरातील पोलीस महासंचालक कार्यालय आणि पाचपावली तसेच इंदोरा येथील पोलीस अंमलदारांच्या निवासस्थानाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही घोषणा केली आहे.

महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण संस्थेने तीन वेगवेगळ्या पद्धतीने प्रस्ताव केले सादर 

नागपूर शहर व ग्रामीण पोलिसांना मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगून राज्यात स्वातंत्र्यापूर्वी ४८ टक्के घरे होती. मात्र, नंतरच्या काळात केवळ ४२ टक्के घरे बांधण्यात आली. घरांची ही कमतरता पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण संस्थेने तीन वेगवेगळ्या पद्धतीने प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केले आहेत असेही गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

कोरोनामुळे राज्य शासनाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने पोलीस विभागाचा महत्वाकांक्षी प्रकल्प वरळी पोलीस सोसायटीच्या जागेत बांधण्यात येणार आहे. प्रकल्प बांधताना पूर्णत: बाहेरुन निधी उभारण्यात येणार असून कंत्राटदाराला ४ एफएसआय देण्यात येणार आहे.

९०० कोटी रुपयांचा प्रकल्प

नागपुरातील पोलीस मुख्यालय आणि आयुक्त कार्यालय इमारतींचेही बांधकाम पूर्ण करत येथे घोडदळ सुरू करण्याबाबत विचाराधीन असल्याचे सांगून पोलिसांसाठी बॉडी वॉर्म कॅमेऱ्यांनंतर सेल्फ बॅलन्सींग स्कूटरही पोलिसांच्या मदतीला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्य पोलीस दल सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे सांगून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ९०० कोटी रुपयांच्या प्रकल्पात सायबर सिक्युरिटी, सेंटर फॉर एक्सलन्स प्रकल्पाचा यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

११२ ही आपत्कालीन सेवा लवकरच

११२ ही आपत्कालीन सेवा लवकरच मुंबईत सुरू करणार असून त्याची दुसरी कंट्रोल रूम नागपुरात करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या दुचाकी-चारचाकी गाड्यांची खरेदीही करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

अतिवृष्टीमुळे मुळे कोसळली विजयदुर्ग किल्ल्याची भिंत

Team webnewswala

लवकरच येणार स्वदेशी लस सरकारने दिले 1500 कोटी

Web News Wala

राज्यात सव्वादोन लाख सरकारी पदे रिक्‍त

Team webnewswala

Leave a Reply