Team WebNewsWala
राजकारण

सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री

ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजून घोषणा करतात.

सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री

Webnewswala Online Team – राज्यातील अनलॉकच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजून घोषणा करतात. केवळ श्रेयवादासाठी या मंत्र्यांनी घोळ घालण्यास सुरुवात केली असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावावी, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे.

राज्यात एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियासी संवाद साधत हा टोला लगावला आहे. राज्यात एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजून घोषणा करत आहेत. कोणत्याही सरकारमध्ये पॉलिसी डिसीजन घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. एखाद्यावेळी मुख्यमंत्री अशा घोषणा करण्यासाठी मंत्री नेमतात आणि ते मंत्री सरकारच्या लाईनवर भाष्य करतात. पण या सरकारमध्ये एकाच विषयावर पाच पाच मंत्री घोषणा करत असतात. विशेष म्हणजे प्रत्येक मंत्री घोषणा करून ही घोषणा मुख्यमंत्री करणार असल्याचं सांगत आहेत. हे सगळं श्रेयासाठी सुरू आहे. हे काही पहिल्यांदाच घडत नाही. अनेकदा असं घडलंय. मंत्र्यांनी पाच पाच वेळा एकाच गोष्टीची घोषणा केल्याचं सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावावी, असं सांगतानाच मेजर पॉलिसी डिसीजनवर सरकारचं म्हणणं स्पष्ट आणि थेट असावं, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.

लोकांमध्ये उत्कंठा, संभ्रम आणि निराशा

राज्य सरकारने आधी अनलॉक जाहीर केला. नंतर घुमजाव केल्याने मला अनेकांचे फोन आले. लॉकडाऊन आहे की नाही आम्हाला विचारण्यात आलं. मात्र, आम्हाला या निर्णयाची माहिती नसल्याने आम्हाला त्यांना काही सांगता येत नव्हतं. पण मुख्यमंत्र्यांची प्रेसनोट अधिकृत असते. त्यावर विश्वास ठेवा, असं मी सांगितलं. पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊननंतर काल लोकांची उत्सुकता वाढली होती. उत्कंठाही वाढली होती. संभ्रमही निर्माण झाला आणि निराशाही झाली. कालच्या घोषणेमुळे अनेक छोटे दुकानदार सुखावले होते, पण नंतर त्यांचा भ्रमनिरास झाला, असंही ते म्हणाले.

दुकानदारांना वेळ अमान्य

सरकारने काही निर्बंध घातले आहेत. त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र दुकानदारांना ही वेळ मान्य नाही. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असं दुकानदारांचं म्हणणं आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

Web Title – सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री ( One Chief Minister and several Super Chief Ministers in the government )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक

Team webnewswala

राष्ट्रपतींचे Tweet हटविणाऱ्या Twitter ची देशातून हकालपट्टी

Web News Wala

खासदार रविकिशन यांना आता Y + Security

Team webnewswala

Leave a Reply