Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय क्रीडा

ओमान ची T 20 World Cup आयोजनाची तयारी

T 20 World Cup स्पर्धा आयोजित करण्याची तयारी ओमान ने दर्शवली आहे. केवळ आता आयसीसी व बीसीसीआय यांच्यात काय निर्णय होतो, यावर हे अवलंबून आहे.

ओमान ची T 20 World Cup आयोजनाची तयारी

Webnewswala Online Team – T 20 World Cup स्पर्धा आयोजित करण्याची तयारी ओमान ने दर्शवली आहे. केवळ आता आयसीसी व बीसीसीआय यांच्यात काय निर्णय होतो, यावर ही स्पर्धा भारतात होणार का अन्य ठिकाणी हे अवलंबून राहणार आहे.

यजमानपद व त्याचे अधिकार कायम राहणार असतील, तर ही स्पर्धा देशाबाहेर घेण्यास हरकत नाही. स्पर्धा अमिरातीतील अबुधाबी, दुबई व शारजासह ओमानची राजधानी मस्कतमध्ये होऊ शकते. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी त्याचे संकेत देण्यात आले आहेत.

आम्ही स्पर्धा देशाबाहेर हलवण्यास तयार असून, आयसीसीला सांगितले आहे. स्पर्धेत 16 संघ सहभागी होतील. आधीचे सामने मस्कतला होऊ शकतात. जर आयपीएल 10 ऑक्‍टोबरला संपली तर अमिरातीत टी-20 सामने नोव्हेंबरमध्ये सुरू होऊ शकतील. यामुळे खेळपट्टी तयार करायला तीन आठवड्यांचा वेळ मिळेल, असे बीसीसीआयने जाहीर केले आहे. त्यातच ओमाननेही T 20 World Cup स्पर्धेच्या आयोजनासाठी तयारी दर्शवली आहे. करोनामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित करावी लागली होती व त्यामुळेच T 20 World Cup बाबतही संभ्रम निर्माण झाला होता.

Web Title – ओमान ची T 20 World Cupआयोजनाची तयारी ( oman is ready for T 20 World Cup organisation )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

‘पाकवॅक’ पाकिस्तानने तयार केली कोरोना लस

Web News Wala

धोनी नव्या इनिंगसाठी सज्ज साक्षीनं दिली आनंदाची बातमी

Team webnewswala

सौदी अरेबिया बनवतेय car free city ‘The Line’

Web News Wala

1 comment

ओमान ची T 2... June 11, 2021 at 1:27 pm

[…] T 20 World Cup स्पर्धा आयोजित करण्याची तयारी ओमान ने दर्शवली आहे. केवळ आता आयसीसी व बीसीसीआय यांच्यात काय निर्णय होतो, यावर हे अवलंबून आहे.  […]

Reply

Leave a Reply